मालेगावी पत्रकारांशी बोलताना खा.संजय राऊत (वरील छायाचित्रात दिसत आहेत ). भारत पवार : मुख्य संपादक आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१ मालेगाव : न्यायालय आवारातून कसमादे टाइम्स महारष्ट्र न्यूज स्पेशल रिपोर्ट : मालेगाव बाह्यचे आमदार तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा मालेगाव कोर्टात दाखल केला होता.म्हणून खा.राऊत यांना आज मालेगाव कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस कोर्टाने बजावली होती.त्यानुसार खा.राऊत मालेगावी आज सकाळी हजर होताच स्थानिक उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी करून घोषणाबाजी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खा.संजय राऊत यांनी सांगितले की,भारतीय संविधानाने मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.शेतकऱ्यानं कडून गोळा केलेल्या १७८ कोटी रुपयांचा हिशोब मागितला आहे मी आरोप नाही केलेला. गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना बचाव या नावाखाली १७८ कोटी रुपये गोळा केले त्याचा हिशोब मागितला तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जातो.मला अधिकार आहे विचारण्याचा भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आमची तयारी आहे.असे खा.राऊत यांनी परखड मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
हिसाब तो देना पडेगा ही भाजपचीच गर्जना आहे.त्यांनी आता हिसाब द्यावा असेही राऊत यांनी बोलतांना सांगितले.पुढे बोलतांना राऊत म्हणाले की , अद्वय हिरे यांना दबावाने तुरुंगात टाकता मग दादा भुसेंना का नाही ? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
मालेगाव कोर्टाने खा.राऊत यांना जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणीची तारीख ३ फेब्रुवारी २०२४ असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.