महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करणार पहिल्या कृषी प्रदर्शनाचं उद्धघाटन ना. दादा भुसेंच्या हस्ते संपन्न

0
417

भारत पवार : मुख्य संपादक                                     आपल्या परिसरातील बातम्या ,जाहिराती साठी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात नवीन पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क करा. ९१५८४१७१३१

चांदवड : महाराष्ट्र न्यूज : शेती मातीच्या गोष्टी केल्या जातात तेव्हा बळीराजा, जगाचा पोशिंदा अशी एक ना अनेक स्तुतीसुमने शेतकऱ्यांवर उधळली जातात. शेतकऱ्याच्या संघर्षाच्या अनेक यशोगाथा समोर येताना ती मात्र कायम दुर्लक्षित राहते. खुरप्या पासून तर ट्रॅक्टर च्या स्टिअरिंग पर्यंत ती शेतीची बाजू भक्कम पणे संभाळते. कौतुकाचे दोन शब्द मात्र तिच्या पदरात कधी पडतच नाही. शेती करताना जेवढे कष्ट पुरुष घेतो तेवढेच ताकदीचे कष्ट महिलाही घेतात. अशाच कर्तृत्ववान महिलांच्या कष्टाला सलाम करत आज चांदवडला रेणुका कृषी प्रदर्शनाच उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. आमदार डॉ. राहुल आहेरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या कृषी प्रदर्शनात महिलांनी केलेली गर्दी चर्चेचा विषय ठरली.

कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना वाबळे इव्हेंट चे सर्वेसर्वा श्री. वाबळे यांनी इत्यंभूत माहिती दिली. आयोजक डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी कृषी प्रदर्शनास मिळालेल्या अफाट प्रतिसादाबद्दल भारावून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. गडी माणसांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्याच इतके कष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांना देखील आपल्या तालुक्याच्या ठिकाणी अस व्यासपीठ उपलब्ध व्हाव या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले. त्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. बदलत्या निसर्गाशी दोन हात करताना आधुनिकतेची कास आपण धरायला हवी. तसेच सेंद्रिय शेती, शेतीपूरक जोडधंदे, शासकीय योजना आदी स्टॉलवर महिलांनी केलेली गर्दी कार्यक्रमाचा उद्देश सफल झाल्याचं प्रतीक असल्याचं डॉ. कुंभार्डे बोलले. यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी या कृषी प्रदर्शनाचे कौतुक करताना तालुका ठिकाणी मिळालेला हा प्रतिसाद बघून मला देखील असेच प्रदर्शन मालेगाव येथे भरविण्यासाठी प्रेरणा मिळाल्याच बोलून दाखवलं. सात बाऱ्यावर आता महिलांनी देखील स्वतःचं नाव लावण्यासाठी आग्रही रहायला हव असं सांगताना हलकेच विनोद करून दादा भुसे यांनी टाळ्या मिळवल्या. डॉ. राहुल आहेरांनी देखील अध्यक्षीय भाषण करतांना तंत्रज्ञानाची कास धरत शेती करण काळाची गरज असल्याचं सांगत नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या कृषी प्रदर्शनाचं ही गर्दी बघून सार्थक झाल्याचं सांगितल.
कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी दिलेल्या भेटी अन् त्यात महिलांचा मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला. दरम्यान दररोज लकी ड्रॉ, निवडक महिलांना पैठणी अशा अनेक उपक्रमांचा लाभ या कृषी प्रदर्शनासोबत घेण्याचं आवाहन यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे  यांनी केलं.

प्रतिक्रिया
महिलांच्या परिस्पर्शाशिवाय कुठल्याच क्षेत्राच सोन होण शक्य नाही. शेती त्याला अपवाद कशी ठरेल? मात्र शेती मातीत राबणाऱ्या याच माय बहिणीना आता आधुनिकतेची जोड द्यायला हवी. याचीच ओळख परेड देणारं हे कृषी प्रदर्शन ठरलं. महिलांनी या प्रदर्शनास दिलेला भरघोस प्रतिसाद बघून समाधान वाटल. सोबतच केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील कृषी प्रदर्शनास भेट देत अनेक स्टॉलवरील महिलांचं मनोबल उंचावल.
– डॉ. आत्माराम कुंभार्डे
रेणुका कृषी प्रदर्शन आयोजक चांदवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here