सामना वृत्तपत्र बाळासाहेब ठाकरेंचे नव्हते…मग ?

0
283

भारत पवार  : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१    मुंबई : ओंकार करंबळेकर करंबळेकर , संजय बोर्डे  बाळासाहेब ठाकरेंचा ‘सामना’ जेव्हा ठाकरेंचा नव्हता, तेव्हाचा खरा इतिहास बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिनानिमित्त विशेष ….महाराष्ट्र न्यूज मधून वाचा..
शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असं समीकरण झालं आहे. पण सामनाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, असं आज सांगितलं तर लोकांचा पटकन विश्वासही बसणार नाही.
1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकातून शिवसेनेची भूमिका मांडली जायची.
1988 साली शिवसेनेचे दैनिकही असावे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली आणि त्याबाबत विचार होऊ लागला.दैनिकाचे नाव काय असावे यावर अनेकांनी अनेक नावे सुचविली, परंतु ती नावे काही समर्पक वाटत नव्हती. एके दिवशी मा. बाळासाहेबांनी दैनिकाचे नाव सुचविले. ‘सामना’.”
सामना नावाची नोंदणी करण्यासाठी सुभाष देसाई दिल्लीला गेle5. वृत्तपत्र नावनोंदणी कार्यालयात कळले की सामना हे नाव बार्शी-सोलापूर येथे राहाणाऱ्या वसंत कानडे यांच्या नावावर आहे. त्यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक होते.
दरम्यान सुभाष देसाई तुळजापूर येथे कामासाठी गेले असताना तुळजापूर विश्रामगृहात बार्शीचे शिवसैनिक श्री. वसंत कानडे यांना घेऊन आले. बाळासाहेबांनी सामना हे दैनिकाचे नाव सुचविले आहे. परंतु या नावाची नोंदणी तुमच्या नावावर आहे. तर वाक्य संपायच्या आत ‘नाव दिले’ असे वसंत कानडे यांनी उद्गार काढले.”
वसंत कानडे कोण होते?
वसंत कानडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे. माढा आणि बार्शी तालुक्यातून त्यांनी पत्रकारिता केली.शिवसेनेचा सामना दैनिक स्वरूपात असलं तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होत होता. 2002 साली कानडे यांचं निधन झालं.”
वसंत कानडे यांनी 10 ऑक्टोबर 1975 रोजी साप्ताहिक सामनाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
या अंकाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन युवक कल्याण राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 23 जानेवारी 1989 रोजी रात्री सामनाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. पहिल्या दिवसाची प्रिंट ऑर्डर 1,50,000 इतकी होती.

‎**शोध पत्रकारितेचा बादशहा लोकनायक संजय बोर्डे**
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here