कानोसा : वॉर्ड क्रमांक ३ मध्ये टिव्ही , वॉर्ड क्रमांक १ मध्ये शिट्टी आणि रिक्षा निशाणी … निवडून आणण्याचा विचार केला मतदारांनी

0
308

निशाणी – वॉर्ड क्रमांक ३ टिव्ही : वॉर्ड क्रमांक  : १ शिट्टी आणि रिक्षा                                             माळवाडी – इलेक्शन फॅक्टर : देवळा तालुक्यातील माळवाडी गावच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनची चर्चा गावात जोर धरू लागली असून उमेदवारांचा प्रचार सुद्धा  अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे.प्रत्येक उमेदवारांनी स्वतःचा आणि स्वतःच्या निशाणीचा प्रचार मतदारांना सांगून प्रचार फेरीचा दुसरा राऊंड समाप्त केला आहे. आता उमेदवार आज पासून प्रचार फेरीच्या तिसऱ्या राऊंड कडे वळणार आहेत.

वॉर्ड क्रमांक तीन मध्ये पवार सुरेखा प्रमोदकुमार यांची निशाणी टीव्ही ( दूरदर्शन) असून पवार यांनी प्रचाराची  दुसरी फेरी पूर्ण केली. मतदारांच्या घरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतला तर कार्य कुशल , संयमी ,सत्यवचनी ,कणखर आणि अभ्यासू नेतृत्व वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आम्हास मिळाल्याने आम्हास आनंद आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हा मतदारसंघ ( वॉर्ड क्रमांक तीन) जन विकासापासून कोसो दूर आहे.आम्ही तुमचा वचननामा वाचला आपण दिलेले मुद्दे भविष्यात आणि भावी पिढी साठी अत्यंत लाभदायक , भावी पिढी चे भविष्य उज्ज्वल करण्या साठी विद्यार्थ्यांच्या ( मुला मुलींच्या) काळजावर चागले संस्कार उमटण्या सारखे आपले कार्य राहणार आहे त्याचबरोबर वयोवृद्ध महिला , पुरुषांसाठी सुद्धा आपण विचार केला त्यांचे साठी लहान दवाखाना , शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन देणार हा सुद्धा वयोवृद्ध व्यक्तींना दिलासा दायक आणि त्यांचे काळीज सुरक्षित राहील याची जाणीव ठेऊन आपण आपल्या वचननाम्यात वचन दिल्याने आम्ही खूप उल्हासित , आनंदीत झालो.आपल्या सारख्या कार्यकुशल , संयमी ,सत्यवचनी आणि एकवचनी ,कणखर नेतृत्व आम्हास वॉर्ड क्रमांक तीन च्या मतदारांना मिळाल्याने आमचे लक्ष कायमच टिव्ही कडे लागल्याने टिव्ही निशाणी चे बटन दाबून आम्ही खरोखरच प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकलप केला असल्याची खात्रीशिर चर्चा वॉर्ड क्रमांक तीन मध्ये होत असल्याची खात्री अनेक मतदारांनी बोलून दाखवली असल्याचे मतदार खंडू डांबरे , महादू बागुल यांचा मित्र परिवार , सुरेश बागुल यांनी आणि त्यांचा मित्र परिवार , संतोष जाधव यांचा मित्र परिवार तर प्रत्यक्ष मतदारांनी उमेदवार सुरेखा प्रमोदकुमार पवार व प्रमोद पवार यांचेशी मतदारांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले.

तर वॉर्ड क्रमांक १ ( एक) मध्ये खुशाल उत्तम पवार यांच्या ” शिट्टी ” तर गायत्री उमेश शेवाळे यांच्या ” रिक्षा ” निशाणी जोर धरला असून जनतेच्या , मतदारांच्या हृदयात बसणारे हे उमेदवार असल्याची दाट चर्चा वॉर्ड क्रमांक एक मध्ये होत आहे.खुशाल उत्तम पवार हे सुसंस्कृत , उच्च शिक्षित आहेत जनते विषयी खुशाल यांना खूप आदर आहे कायम हसत बोलणे ,आदराने जनतेची चौकशी करणे हे आमच्या साठी खूप आहे अशी बोलकी प्रतिक्रिया वॉर्ड क्रमांक एक च्या मतदारांनी व्यक्त केली असून खुशाल पवार यांच्या उमेदवारी मुळे आम्हास आनंद होत आहे खुशाल निवडून आल्यास मतदार जनतेसाठी खरोखर काहीतरी करून दाखविणार कारण यांच्या रकत्तात करून दाखविणे आहे. थापा मारणे हा दोष यांच्या रक्तात नाही त्यामुळे खुशाल पवार यांची निशाणी शिट्टी समोरील बटन दाबून आम्ही विजयी करणार आणि शिट्टी नक्कीच वाजणार अशी बोलकी प्रतिक्रिया वॉर्डातील अनेक मतदारांनी दिली.

त्याच वॉर्ड क्रमांक १ ( एक) मधील गायत्री उमेश शेवाळे हे उमेदवारी करत असल्या मुळे महिलांमध्ये आनंद पसरला आहे.कारण गायत्री यांना महिलांमध्ये राहून महिलांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे.आजपावेतो कुठल्याही पदावर नसताना सुद्धा त्यांच्या मनमिळवू स्वभावाने त्यांनी अनेक महिलांशी संवाद साधत सबंध चांगले ठेवले आहेत.त्यांचे पती उमेश शेवाळे उर्फ पिनु ह्या नावाने सगळ्यांच्या परिचित आहेत.उमेश यांचे बोलणे अगदी हसून पण कणखर असते.कायम मतदारांशी ,जनतेशी संपर्क ठेऊन त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्नांची विचारपूस उमेश कायम करत असतात.त्यांचा स्वभाव उर्मट , डांबरट , गर्विष्ठ नसल्यामुळे उमेश यांनी अनेक मित्र परिवार मध माशीच्या पोळ्या प्रमाणे जमवला आहे.कायम मित्रान मध्ये राहून जवळीक ठेवणे असा स्वभाव दोघा पती पत्नी यांचा असल्या मुळे गायत्री शेवाळे यांची रिक्षा निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा विडा आम्ही मतदारांनी उचलला असल्याचे वॉर्ड क्रमांक एक मधील बऱ्याचशा मतदारांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.त्यामळे महारष्ट्र न्यूज ने घेतलेला वॉर्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक एक मधील तिन्ही उमेदवारांबाबत घेतलेला हा कानोसा खरा ठरण्याची दाट चिन्हे दिसू लागली आहेत.

वॉर्ड क्रमांक तीन मधील टिव्ही , वॉर्ड क्रमांक एक मधील शिट्टी व रिक्षा निशाणी घेतलेले उमेदवार सूसंस्कारित , मितभाषी , सगळ्या जनतेशी जवळीक असून त्यांच्या जिभेवर गोडवा पसरलेला आहे.त्यांचे पती सुद्धा संयमाने बोलणे , असलेल्या माणसांचे विना पैशाने काम करून देणे , कायम जनतेच्या सहवासात राहून अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक पणाने प्रयत्न करणे असेच आहेत.त्यामुळे त्यांचा मित्र परिवार खूपच मोठा असल्या कारणाने मतदारांना आनंद तर झालाच त्यांच्या अपेक्षा सुध्दा वाढल्या.की जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक टिव्ही , शिट्टी आणि रिक्षा निशाणी असलेले उमेदवार आणि त्यांचे पती सोडविणार कारण आजही जनतेत राहून त्यांनी जवळीक ठेवली आहे.

त्यांच्या स्वभावात त्यांच्या नसा नसात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, दैवत शिवाजी महाराज,  भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर , संत रोहिदासजी महाराज यांचे कार्य भिनले आहे.ह्या महामानवांचा विचार नसा नसात संचारला आहे म्हणूनच तर यांच्या जिभेत गोडवा आहे.यांच्या स्वभावात प्रेमळपणा आहे. यांच्यात डांबरट , सडके , कुजलेले विचार शैली , खवचट बोलणे, मतलबी पणाने वागणे यांच्या रक्तात नाही.तर एके काळी ज्यांनी मार खाऊ घातला ते प्रकरण आमच्या कणखर पत्रकारांनी मिटवावे आणि पुन्हा मार खाऊ घातलेल्यांचीच जोडे पुन्हा , पुन्हा उचलणे आमची अवलाद नाही .आम्ही कणखर राहून जनहिताची कामे इमानदारीने , मानाने आणि प्रेमळ पणाने करून देऊ त्यामुळे मतदार आमच्या पाठीशी आहेत आमचा विजय जनता आमच्या कामाच्या आणि आमच्या प्रेमळ वागणुकीच्या पावत्या आम्हाला नक्कीच मतदानातून देणार अशी सडेतोड प्रतिक्रिया शिवव्याख्याते यशवंत गोसावी,नितीन (फन्टर ) शेवाळे , दादाजी खैरनार , खंडू डांबरे , सुरेश बागुल यांनी व मित्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here