वॉर्ड क्रमांक ३ चे मतदार नका राहू भ्रमात ,टीव्ही निवडून आणा आरामात …! प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत नवीन उमेदवार निवडावा _ भारत पवार

0
362

जाहिराती , बातम्या साठी संपर्क : ९१५८४१७१३१

वॉर्ड क्रमांक ३ , निशाणी – टीव्ही ( दूरदर्शन).            माळवाडी : इलेक्शन फॅक्टर : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रचारास आज पासून काही उमेदवारांनी नारळ वाढून शुभारंभ केला. यावेळी पवार सुरेखा प्रमोदकुमार – निशाणी टिव्ही , गायत्री उमेश शेवाळे _ निशाणी – रिक्षा , खुशाल उत्तम पवार _ निशाणी _ शिट्टी , पवार सुलोचना अनिल _ ( थेट सरपंच पदा साठी) – निशाणी – कपबशी आदी उमेदवारांनी संपूर्ण गावात मतदारांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतला.मतदारांनी चांगलाच प्रतिसाद देत सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद दिले. नवीन उमेदवार आहात आपण गाव विकासाला चालना द्या असेही मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वॉर्ड क्रमांक तीन मधील मतदारांनी गाफील न राहता दादागिरी आणि गुंडगिरी पासून मुक्त , मोकळे होण्या साठी टिव्ही निशाणी चे बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून आणल्यास तुम्हा सर्वांना भय मुक्त वातावरण करून वॉर्ड विकासाला चालना देण्यात येईल.प्रतिस्पर्धी ची पायाखालची जमीन सरकत असून तो मतदारांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कावा करताना दिसतोय.तू तिथे का थांबला ? त्यांचेशी का बोलला ? त्याला हात का दिला ? असे सायको असल्यागत त्यांचे वागणे ,त्यांचे बोलणे होत असल्याने मतदारांनी खंबीर होऊन न घाबरता थेट पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.जर अशा हुकूमशाही करणाऱ्या उमेदवारास मतदारांनी निवडून दिले तर त्यांची अधिकच दादागिरी , गुंडशाही अधिकच वाढणार आहे.वॉर्ड विकास न करता मतदारांना म्हणजेच तेथील रहिवाशांना धाकात ठेवणे हाच प्रकार सर्रास पने सुरू होईल म्हणून मतदारांनी यापुढे न घाबरता बिन्धास्त पने फिरत टिव्ही निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे.म्हणजेच वॉर्ड विकासाला सर्व मिळून हातभार लावावा असे आवाहन भारत पवार , प्रमोद पवार,महादू बागुल आदींनी केले आहे.लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने मत मागायला जाणे किंवा कोणी कोणाशी बोलणे न बोलणे हा त्या मतदाराचा वैयक्तिक हक्क आहे. यास कोणीही विरोध करू शकत नाही.आज पर्यंत असेच चालत आले आहे आणि ज्या घराण्याने  ,ज्या कुटुंबाने किंवा वंशपरंपरा ग्रामपंचायत सदस्य पासून तर उपसरपंच पर्यंत गेल्या २५-३० वर्षांपासून तर आज तागायत एक वारस हक्क प्रमाणे त्यांची पिढीच ग्रामपंचायतीत चालली अशांनाच पुन्हा मतदारांनी निवडले तर आज पर्यंतचा इतिहास आहे की , वॉर्ड चा विकास नाही तर वॉर्ड भकास झाल्या शिवाय राहणार नाही.त्यामुळे वॉर्ड क्रमांक ३ च्या मतदारांनी भ्रमात न राहता ,दबावाला भिक न घालता मुक्त मनाने टिव्ही निशाणी चे बटन दाबून प्रचंड मतांनी पवार सुरेखा प्रमोद यांना विजयी करून आपला आणि भविष्यातील उज्वल तेचा विचार करावा असे आवाहन भारत पवार यांनी केलेआहे. कुठल्याही मतदारास जीवनात सक्सेस व्हायचे असेल तर प्रत्येक पंचवार्षिक मध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक वेळी नवीन उमेदवार निवडून आणावा म्हणजे वॉर्ड विकासाला चालना भेटते.हुकूमशाही , गुंडगिरी हद्दपार करता येते. म्हणून आताच्या म्हणजेच रविवार दिनांक ५ नोव्हेंबर ०२३ रोजी होणाऱ्या मतदानास जाताना घराणेशाहीला अर्थात वारस हक्कास कायमचे हद्दपार करून नवीन उमेदवार निवडून आणावा.टीव्ही निशाणी असलेल्या सुरेखा प्रमोदकुमार पवार यांना निवडून देऊन माझा शब्द आहे तुमच्या येणाऱ्या पिढीस नक्कीच प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा प्राप्त करून देणार हा माझा विश्वास तुम्ही खरा कराल याची मला पूर्ण खात्री आहे.म्हणून मी खात्री देतो वॉर्ड क्रमांक तीन चा विकास हाच आमचा ध्यास आहे.म्हणून वॉर्ड तीन मधील मतदारांनी भ्रमात न राहता टिव्ही चे बटन दाबून टिव्ही निवडून आणा आरामात असे आवाहन पत्रकार भारत पवार यांनी यावेळी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here