निशाणी – टी व्ही ( दूरदर्शन )
देवळा / माळवाडी : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे आता काहीसे जोर धरू लागले असून तीनही वॉर्डातून उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.बाकी अन्य काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीची हवा काहीशी थंड झाली आहे.
वॉर्ड क्रमांक ३ ( तीन ) चे उमेदवार सौ.पवार सुरेखा प्रमोदकुमार (प्रमोद पवार) ह्या टी व्ही ( दूरदर्शन ) निशाणी घेऊन प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत.सौ.पवार सुरेखा प्रमोदकुमार ह्या शिक्षित असून सुसंस्कृत , शालीन आणि माणुसकी जपणारे आहेत.वॉर्ड तीन मधील ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी स्वतः प्रयत्न करून वॉर्डातील मतदार जनतेस समस्या मुक्त करणार असा निर्धार सौ.पवार सुरेखा प्रमोदकुमार यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.त्यांनी पुढे सांगितले की, मी माळवाडी गावची सासुरवाशीण असून महामानव क्रांतीसुर्य महात्मा फुलेंच्या वारसा चालविणाऱ्या पुण्यभूमीतील पावन असलेले माझे मतदार अर्थात माझे सर्वच मतदार सासू – सासरे ,दिर – दिरानी तसेच महान संत रोहिदासजी ( रविदासजी ) महाराज यांचे वारसा चालविणारे माझे मतदार सासू , सासरे ,दिर , दिरानी ह्या सगळ्यांची सेवा करण्याचे भाग्य माझे पती प्रमोद पवार यांच्या सहवासात राहून मिळाल्याने हे माझे मोठे भाग्य असून महामानव फुलेंच्या वारसा महान संत रोहिदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी वॉर्ड क्रमांक ३ ( तीन ) मधून माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करीत असून माझी निशाणी टिव्ही ( दूरदर्शन ) असून टिव्ही समोरील बटन दाबून तुमच्या सूनबाईस /भावजईस प्रचंड मतांनी विजयी करून वॉर्ड क्रमांक तीन चा विकास करण्याची संधी द्यावी असे भावनिक आवाहन सौ.सुरेखा प्रमोद पवार यांनी यावेळी केले.माझे सासरे पत्रकार तर पती प्रमोद पवार हे राजकारणी असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा तर आहेच परंतु शासन दरबारी त्यांचा दांडगा संपर्क सुद्धा आहे.त्यामुळे शासना कडून जनविकासाची कामे , जनते साठी शासनाच्या विविध योजना माझ्या जनते साठी , माझ्या मतदारांसाठी राबविणार यात शंकाच नाही.त्यामुळे माझ्या टिव्ही निशाणी समोरील बटन दाबून मला निवडून दिल्यास माझा आपणास शब्द आहे की विकास कामे आधी करून दाखविणार मगच क्रांतीसूर्य म.फुले व महानसंत रोहिदासजी महाराज यांचा वारसा जपणारी पावन भूमीतील वारसा जपणाऱ्या माळवाडी गावची आपली खरी सूनबाई म्हणून ओळख सांगणार असेही भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून मी माझ्या महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महान संत रोहिदासजी महाराज ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने सामाजिक आणि राजकीय चळवळीत सहभागी आहे.त्यामुळे माझे अनेक मित्रांचे मी आणि माझे पत्रकार काका ( तात्याश्री ) भारत पवार यांच्या सहकार्याने कामे केलीत.आमचे घरातील राजकारणाचे सूत्र हलवत अनेक मित्रांचे वडील माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आणलेत.त्यातील काही सरपंच ,तर काही उपसरपंच पण झाले होते.असे असताना सध्या होत असलेल्या माळवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अचानक पणाने मला धोका देत मला दगा देत पाषाणरुपी व्यक्तीच्या मांडीलामांडी लाऊन बसून फिरत आहेत.याचे मला खूप दुःख वाटत आहे.ज्याने आजपर्यंत ह्या माझ्या मित्रांची एकही काम करून दिले नाही किंवा ज्याचे घरातून एकदाही राजकारणाची सूत्रे फिरवले गेले नाहीत अशा निष्काम माणसाबरोबर फिरून प्रचार करणे हे कितपत योग्य वाटते .याचा विचार त्या माझ्या मित्रांनी स्वतःच्या घरातील कोपऱ्यात एकदा तरी बसून शांत पणाने विचार केल्यास त्याचे उत्तर त्यांना नक्कीच मिळणार.की मी स्वतः खरोखर त्या माझ्या मित्रांच्या कामी आलो की नाही ? आपले चुकले की नाही ? आणि आपले चुकत आहे काय ? याचे उत्तर नक्कीच मिळणार.मी तुमचे कामे केली म्हणून मला अशा प्रकारे धोका देऊन हेच का माझ्या केलेल्या कामाची परत फेड ? असा भावनिक सवालही प्रमोद पवार यांनी केला असून,माझे मित्र आज जरी मला सोडून गेलेत पण मी त्यांना मात्र सोडलेले नाही मात्र आज ते जरी माझ्या पाठीशी नाहीत परंतु मी केलेल्या कामाची पावती म्हणून ,माझ्या कामाची प्रामाणिक जाणीव म्हणून त्यांच्या आई , वडिलांचा आशीर्वाद त्यांचे आई, वडील माझ्या पाठीशी माझे आई वडील म्हणून उभे आहेत.हे ठाम पणाने प्रमोद पवार यांनी सांगितले असून आपण अर्थात त्यांची सून सुरेखा प्रमोदकुमार पवार ह्या त्यांच्याच पाठबळाने निवडून येणार अशी खात्री प्रमोद पवार यांनी यावेळी दिली.त्यामुळे माझी पत्नी सुरेखा प्रमोदकुमार पवार यांस प्रचंड मतांनी निवडून दिल्यास मी आवर्जून वॉर्ड तीन चा विकास तर करणारच त्याच बरोबर माळवाडी गाव विकासासाठी कायम प्रयत्नशील असणार असेही पवार यांनी सांगितले असून वॉर्ड क्रमांक तीन मधील माझ्या आई वडिलांनी माझ्या कार्याची ,गेल्या १५ ते २० वर्षांच्या आपल्या प्रेमाची ,माझ्या सहवासाची जाणीव ठेऊन माझी पत्नी सौ.सुरेखा प्रमोदकुम्मार पवार हिच्या टिव्ही निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावी असे आवाहन प्रमोद पवार यांनी ही मतदार राजांना केले आहे.