भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा , जाहिराती आणि आपल्या परिसरातील बातम्या करीता भेटा. मो. ९१५८४१७१३१
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल : खास प्रतिनिधी – संजय बोर्डे :महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशांपैकी एक, सुमारे २०० ते ३०० वर्ष जुना मढ किल्ल्याचे वैभव पूर्ववत करण्यासाठी खा.गोपाळ शेट्टी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. सुधाकर शिंदे जी आणि इतर अधिकार्यांसह संयुक्त बैठक घेतली.
मढ, मालाड पश्चिम येथील
हा किल्ला सुशोभित करून सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि प्रवासींसाठी खुला करण्यासाठी जोरदार प्रयत्न खा. गोपाळ शेट्टी करत आहेत. सध्या हा किल्ला भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत असल्याने स्थानिक लोकांना किल्ल्यावर जाता येत नाही. खा.गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नाने येत्या काही वर्षांत सर्वसामान्यांना किल्ला जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. महानगर पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून लवकरच या किल्ल्याच्या सुशोभिकरणाचे काम करण्यात येईल.
या बैठकीला खा.गोपाळ शेट्टी यांच्यासह मुंबई भाजपचे सचिव युनूस खान, विनोद शेलार, योगेश वर्मा, ज्ञानमूर्ती शर्मा, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, माजी नगरसेवक कमलेश यादव, बाळा तावडे, सरचिटणीस बाबा सिंग, दिलीप पंडित, निखिल व्यास, भूषण वाडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.