नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ राजू केदारे यांचे कडून _ नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का द्यायला सुरुवात करून भाजपाला गळती लावली आहे. आता भाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आमदार गणेश नाईक यांचे पालिकेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. सुरुवातीला शिवसेना व नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून नाईकांनी महानगरपालिकेची सत्ता मिळविली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला असून महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे निवडणुका जवळ आल्यापासून भाजपमधील नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये जाण्यास सुुरुवात झाली आहे. आतापर्यंत १३ जणांनी पक्ष सोडला आहे. सोमवारी जुईनगर प्रभाग ८३च्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला अजून एक धक्का बसला आहे. भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये दाखल होत असून ही गळती थांबविण्याचे आव्हान गणेश नाईक यांच्या समोर उभे राहिले आहे.