नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे कृषी महोत्सव उत्साहात संपन्न

0
41

 

शहादा ( नंदुरबार )_ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ संजय मोहिते _ यांचे कडून _  शहादा तालुक्यातील वाघोदा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी महोत्सव कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत कृषी महोत्सव संपन्न झाला.
दरवर्षी स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीप्रणित नाशिक येथे होणारा कृषी महोत्सव हा कोरोना पार्श्वभूमी बघता शेतकरीच्या बांधावरील कृषी महोत्सव वाघोदा याठिकाणी जिल्हा स्वामी समर्थ केंद्र नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. प्रमुख वक्ते आदरणीय मंगेश देवरे व शेतकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यात सेवा मार्गातील १८ ग्रामअभियान सेंद्रिय शेतीच्या प्रात्यक्षिकसह कृषी विषयक माहिती व मार्गदर्शक वेगवेगळे स्टॉल प्रदर्शित करण्यात आले होते. बांधावरील या कृषी महोत्सवात शेतीवरती रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम,सेंद्रिय खतांचा फायदा व शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल ,उत्पादनाला भाव कसा मिळेल, तसेच कृषीविषयक जोडव्यवसाय प्रक्रिया उद्योग,आधुनिक शेती अवजारे व देशी-गावरान बियाणांवर मार्गदर्शन करण्यात आले. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून विषमुक्त शेती करण्यासाठीचे उपाय करणे आवश्यकता आहे.अध्यात्मिक व सेंद्रिय शेतीसह बाल संस्कार,युवा संस्कार,मराठी अस्मिता या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून आ. मंगेश देवरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंचक्रोषीतील सरपंच,पोलिस पाटील, ग्रामसेवक,तलाठी,प.स. सदस्य,कृषी सहाय्यक व शेतकरी महिला आणि पुरुष यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमास शहादा केंद्र,कार्थदा,वैजाली वाघोद,नांदडै,परिवर्धा तसेच बरेचशे सेवा केंद्रातील सेवेकरी,ग्रामस्थ,शेतकरी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here