मंत्री पदी राहण्याचा नैतिक अधिकार धनंजय मुंडे नी गमावला _ डॉ.राजन माकणीकर

0
76

 

मुंबई दि.१८ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” (प्रतिनिधी) _सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी मंत्री पदाचा अधिकार गमावला असल्याने स्व:खुशीने राजीनामा द्यावा अशी मागणी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे.

नामदार धनंजय मुंढे हे करूणा शर्मा या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असतांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्ये आहे. या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वतःचे नाव लावले आहे, याच महिलेच्या बहिणीने म्हणजेच गायिका असलेल्या रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे हे आधीपासून विवाहित आहेत. रेणू शर्माच्या मते धनंजय मुंढे यांनी तिच्या बहिणीशी लग्न केले आहे हे जर सत्य असेल तर मुंडे यांच्याकडून द्विभार्या प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

सोबतच पहिल्या पत्नीची 3 अपत्ये आणि या पत्नीकडून 2 अपत्ये अशी 5 अपत्ये त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केले आहेत का? आणि केले नसेल तर येथेही त्यांनी कायद्याचंच उल्लंघन केले आहे.

हे प्रकरण त्यांच्या परिवारातील सदस्यांना मान्य असेल ही खाजगी बाब असली तरी सुद्धा सार्वजनिक आयुष्यात आहेत राजकारणात आहेत, जीच्यासोबत 2 मुलांना जन्म दिला तिच्या बहिणीनेच बलात्कारासारखा गंभीर आरोप केला हे फार सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कारकिर्दीला कालिंबा फासणारी बाब होय.

२००६ पासून बॉलिवूड मध्ये चांगली संधी मिळवून देऊ असे आमिष दाखवून रेणू शर्मा सोबत अनैतिक संबंध ठेवल्याची तक्रार तिने पोलिसात केली आहे, पोलीस यंत्रणेकडून निपक्षपणे तपास व्हावा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पीडित महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून धनंजय मुंडे यांनी चौकशी संपेपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आग्रही भूमिका पक्षातर्फे घेतली गेल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.

मुंबई पोलिस याप्रकरणी लवकरात लवकर गुन्हा नोंदवतील, कोणत्या आमिषाला किंवा राजकीय दबावाला बळी न पीडितेला न्याय मिळवून देतील असा आशावादही डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here