नवीमुंबई त अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या तीन शाखांचे उद्घाटन सोहळा पार पडला , कार्यकर्त्यांनी गर्दीचा उच्चांक गाठला

0
43

 

 

नवी मुंबई _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “,_ खास प्रतिनिधी _ रविवारी १० जानेवारी रोजी नवी मुंबईत तीन शाखांचे उदघाटन मनसे नेते अमित राजसाहेब ठाकरे, आमदार राजूदादा पाटील आणि मनसे सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नवी मुंबईत मोठ्या वेगाने फोफावताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून बेलापूर, वाशी, कोपर खैरणे येथे मनसे शाखांचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

बेलापूर मधील दिवाळे गावात मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या शाखा उदघाटन प्रसंगी स्थानिक कोळी महिलांनी, पुरुषांनी पारंपरिक कोळी वेष परिधान करून कोळी गीतांवर ठेका धरला होता. स्थानिक भूमिपुत्रांचा उत्साह ओसंडून वाहत होता. वाशी, सेक्टर – १ मध्ये मनसेचे शहर सह सचिव अमोल इंगोले-देशमुख यांच्या पुढाकाराने झालेल्या शाखा उदघाटन प्रसंगी स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कोपर खैरणे, सेक्टर -१४ मध्ये मनसेचे उप शहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या पुढाकाराने झालेल्या शाखा उदघाटन प्रसंगी महिलांची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत होती. शाखा उदघाटन प्रसंगी असलेली गर्दी पाहून प्रस्थापितांनी धसका घेतल्याची चर्चा परिसरात होती.

अमितसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्र सैनिकांना, नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तिन्ही शाखा उदघाटन प्रसंगी असलेली गर्दी पाहून आमदार राजूदादा पाटील यांनी मनसे येत्या महानगरपालिका निवडणुकीत जोरदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी महिलांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती दाखवून देते कि मनसे येत्या निवडणुकीत निश्चित प्रभावी कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला.

या तीन शाखा उदघाटन प्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, रोजगार विभाग अध्यक्ष महेंद्र बैसाणे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव दिनेश पाटील, शरद दिघे, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर, रोजगार सेना शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहर अध्यक्ष सागर नाईकरे , विधी विभाग शहर अध्यक्ष निलेश बागडे, रायगड मनविसे जिल्हा अध्यक्ष ऍड. अक्षय काशीद, पालिका कामगार सेना कार्याध्यक्ष अमोल आयवले, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, दीपाली ढउल, शुभांगी बंदीचोडे, विद्यार्थी सेना उप शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, प्रेम दुबे, इतर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here