मोठी बातमी :इंग्लंड व अन्य देशात नवीन कोरोना विषाणू दाखल…इंग्लंड ची व्यक्ती मुंबईत आली आणि खळबळ उडाली ,विमान सेवा तातडीने बंद त्या व्यक्तींची शोध मोहीम जारी ,मुंबई महानगरपालिकेशी संपर्क करण्याचे आयुक्तांचे आवाहन

0
39

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी राजू केदारे _ इंग्लंड (England )आणि काही इतर देशांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू (New strain of virus in UK) आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने खबरदारी घेत विमान सेवा बंद केली आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लडहून मुंबई आणि नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
इंग्लंडमधील काही भागात जनुकीय रचनेत बदल झालेला करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळलेला आहे. या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे 25 नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या व्यक्तींनी त्वरित नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे. सदर व्यक्तींकरिता आरटी-पीसीआर चाचणी सुविधा एमजीएम रूग्णालय, सेक्टर 30, सानपाडा,वाशी येथे करण्यात आलेली आहे.

त्यासोबतच मागील काही दिवसांपासून दैनंदिन करोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगून मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सींग आणि वारंवार हात धुणे या कोरोनापासून बचावाच्या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे व “कोव्हीड बचावात्मक अनुकूल वर्तन (COVID Appropriate Behavior)” ठेवणे गरजेचे आहे. सुरक्षा नियमांचे पालन हीच करोनापासून बचावाची ढाल आहे हे लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here