2021 नव वर्षाच्या स्वागतसाठी नवी मुंबई तील पोलीस सज्ज तर ५ जानेवारी पर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी

0
29

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ २०२१ च्या स्वागताच्या साठी नवी मुबई तिल सर्व नागरिक तसेच हॉटेल, बार रेस्टॉरंट सज्ज झाले आहेत त्याच अनुशंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २०२१ च्या स्वागताच्या बंदोबस्ताची सर्व तयारी झालेली आहे. यात करोना संसर्गजन्य नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांवर ड्रंक अन्ड ड्राइव् करणार्यांवर कारवाई करण्यात येनार आहे. यावर्षी संचारबंदी असली तरीही मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असणार आहेत. सर्व चौकात ब्रेथ अनायझर सहवाहतूक पोलीस तैनात असतील. जास्त करून शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्गावर पोलिसांची नजर असणार आहे.
राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याने सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला असला तरी नवी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल असे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले
३१ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान असणारा बंदोबस्त यावर्षीही असणार आहे. तरी कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये तसेच नागरिकांनी सहकार्य करावे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here