* ब्राह्मणगाव – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ वार्ताहर _ नासिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव येथे आरोग्य विषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रुग्ण कल्याण नियामक समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्या सौ. लताताई बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या सर्व गावांमध्ये कोरोना आजार पसरू नये याबाबत केलेली उपाययोजना, प्राथमिक आरोग्य केंद्राचा विस्तार बघता दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी शासनाने नेमावेत यासाठी पाठपुरावा करणे,कोरोना आजार व इतर साथीचे आजार पसरू नयेत यासाठी गावागावात फवारणी करणे, कार्यक्षेत्रातीलआरोग्या बाबत व इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी लता ताई बच्छाव,जेष्ठ नेते यशवंत बापू आहिरे ,रिपब्लिकन पक्षाचे तालूका अध्यक्ष बापुराज खरे,सरपंच सौ. सरला ताई आहिरे,पत्रकार काशिनाथ हांडे यांनी जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी काय करावे याबाबत मौलिक विचार व्यक्त केलेत.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सौ.लता ताई बच्छाव, सरपंच सौ.सरला ताई आहिरे,रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बापुराज खरे,जेष्ठ नेते यशवंत बापू आहिरे,पत्रकार काशिनाथ हांडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अहिरराव,प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कांबळे, डॉ.आवारे,जगताप तात्या,दगाअण्णा आहिरे, निंबाजी आहिरे तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पाहिजेत _ अगदी अल्प / कमी दिवसात महाराष्ट्र भर 20 हजार च्या पुढे वाचक असलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात पत्रकार,प्रतिनिधी तसेच विविध संपादक पदे त्वरित भरणे आहेत.तरी काम करणारे इच्छुक व जनसंपर्क असणाऱ्यांनी संपर्क करावा . संपर्क : भारत पवार,मुख्य संपादक , मो. 9158417131