मालेगाव _ दि.७.क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी _ ७/१२ सदरी असलेल्या इनाम वर्ग 3 च्या जमिनी वरील शेरा कमी करून भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आर.पी.कुंवर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.1000 ते 15000 ह.हेक्टर जमिनी वरील देवस्थान इनामसह इनाम वर्ग तीन च्या संपूर्ण जमिनी ह्या वर्ग एक मध्ये रुपांतरीत झाल्यास शासनाचा कोट्यवधी रू. चा महसूल वाढणार आणि शेतकऱ्यांनाही फायदा होणार असेही कुंवर यांनी आपल्या निवेदनात म्हटले असून सदर जमिनीचे खरेदी विक्री मूल्यांकन दुय्यम निबंधक यांचे कडून उपलब्ध करून घेऊन शासकीय मूल्यांकना च्या 15 टक्के आकारणी केल्यास आणि ज्याप्रमाणे 8 मार्च 2019 शासन परिपत्रक प्रमाणे वर्ग 2 चे रूपांतर वर्ग 1 मध्ये केले त्याचप्रमाणे वर्ग 3 चे रूपांतर केल्यास शासनाला 20 ते 25 हजार कोटी रुपयांचे महसूल ( नजराणा ) उपलब्ध होऊ शकेल त्यामुळे शासनाचे व शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण होईल आणि शेतकरी शासनाच्या पाठीशी असतील तर महुसल वाढल्या मुळे शासनाचा फायदाच होईल असेही कुंवर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पाहिजेत _अल्पावधीतच महाराष्ट्र भर लोकप्रिय झालेल्या महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनल साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक महानगरात पत्रकार, विभागीय संपादक नियुक्त करणे आहेत तरी इच्छुक असणारे व जनसंर्क असणाऱ्यांनी त्वरित संपर्क करावा. संपर्क : भारत पवार, मुख्य संपादक ,मो.9158417131