वासोळ : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी _ निंबोळा येथील मामाच्या गावी सापाचा दंश, बारा दिवस झुजुनही अखेर सलोनीला मृत्युने कवटाळले मामाचे संपूर्ण गाव शोक सागरात… बागलाण तालुक्यातील दुर्देवी घटना ….
कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली होती. दिवाळी पाडव्याच्याच दिवशी झोपेत असतांना घडले अघटित. ती गाढ झोपेत असतांनाच आला अनपेक्षित पाहुणा. पाहुणा कसला काळच होता तो. अन् नंतर घडले असे…
बारा दिवस झुंजूनही सलोनीला मृत्यूने गाठले
सलोनी बिरारी ही बारावीत शिकणारी तरुणी दिवाळीनिमित्त निंबोळा (ता. बागलाण) येथे मामाच्या गावी गेली होती. तिला दिवाळी पाडव्याच्या दिवशी झोपेतच मण्यार या अतिविषारी सर्पाने दंश केला. तेव्हापासून तर काल पर्यंत तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली. स्वभावाने अतिशय मनमिळावू, शिक्षणात हुशार व कुटुंबातील एकुलत्या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
अतिविषारी सर्पाच्या दंशामुळे सलोनीला उपचारासाठी तत्काळ दाभाडी व लगेच मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तब्बल बारा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती.
अखेर संपूर्ण शरीरातच विष भिनल्यामुळे शनिवारी (ता.२८) सकाळी तिची प्राणज्योत मालवली. सायंकाळी कंधाणे अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ती विलास बिरारी यांची एकुलती मुलगी व ‘बॉश’ नाशिकचे कर्मचारी राजेंद्र बिरारी यांची पुतणी होती.