जालना : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज – प्रतिनिध -जालना जिल्ह्यातील भोकर दन तालुक्यातील पालसखेड पिंपळे येथील एकाच घरातील तीन सख्खे भाऊ विजेने बळी घेतल्याने गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्या जीवाची होळी होतेय असा आक्रोश पालसखेड गावातील ग्रामस्थांनी केला तर संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवारी रात्री आठच्या सुमारास तिघे भाऊ ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव,रामेश्वर आप्पासाहेब जाधव व सुनील आप्पासाहेब जाधव गव्हाला पाणी देण्यासाठी गेलीत. आणि अंधाऱ्या रात्रीत विद्युत पंप चालू करत असताना एकाला शॉक लागून तो विहिरीत कोसळला. जवळच दोघे भाऊ उभे होते.त्यानी आपल्या भावाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली रात्रीची वेळ असल्याने नेमकं काय झाले असेल , विहिरीच्या पाण्यात करंट होतं .असं तेथील ग्रामस्थांनी सांगितले. वीजवितरण कंपनी वर गुन्हा दाखल करून मयत भाऊ हे घरात करते होते त्यांच्या मृत्यू मुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून वयोवृद्ध आई वडील आहेत.त्यामुळे शासनाने वयोवृध्द आई वडिलांना भरघोस मदत द्यावी.नुसती जाहीर न करता त्यांच्या हातात मदत देऊन एक हात मदतीचा शासनाचा याची सत्यता माय बाप सरकारने येऊ द्यावी व दुःखित कुटुबातील मयत असलेल्या वारसांना कोणत्याही तिघांना कायम साठी शासनाने नोकरी द्यावी अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.