दिवाळीची लगभग सुरू झाली परंतु कोरोनाणे सासुरवाशीण नाराज केली तर भाऊ – बहिणीची भेट ही दुरावली

0
41

ओझर टाऊन शिप- दि.१३ – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” भारत पवार यांज कडून – देशभरात दिवाळी सणा च्या उत्सहा स सुरुवात झाली असली तरी ग्रामीण भागात म्हणावा असा प्रतिसाद जनते कडून दिवाळी सणासाठी मिळत नसल्याचे जाणवते.गेल्या वर्षी दिवाळीच्या १५ दिवस आधी घरा घरात उत्साह दिसत होता सासुरवाशीण माहेरी येण्या साठी अगदी तयारीत असायची तर भाऊ बहिणीला आठ ते दहा दिवस आधीच माहेरी घेऊन यायचा .आणि त्या दिसापासूनच दिवाळीचा आनंद रोमारोमात संचारलेला असायचा अगदी इतका की पाहुण्यांची वर्दळ,गाड्या यांची तर वरधीच इतकी की रस्त्याने पायी चालायला होत नसे परंतु यंदा आजच्या दीपावलीचा आनंद असून व्यक्त करता येत नाही आणि दाखवता ही येत नाही अशी अवस्था कोरोना महामारी मुळे झाली आहे.कारण बहिणीला खूप वाटते माहेरी जाऊन भावास ओवाळावे पण जाणार कशी ? ह्या महामारी मुळे तर भावास वाटते बहिणीस दिवाळीत एकदा तरी घरी आणावे पण ? कोरोना ? त्यामुळे आजही ग्रामीण भागात रस्ते जरा निवांत दिसतात गर्दी हिरावून बसले सगळे तर शासनाने फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यास सांगितले असे असले तरी बऱ्याचशा ठिकाणी भीती ,श्वास दबल्या सारखे वातावरण तर अनेक ठिकाणी बहीण सण साजरा करण्या साठी माहेरी न आल्यामुळे बहीण मुक्त दिवाळी साजरी भाऊ बहिणी स अंतरी असे चित्र ग्रामीण भागात दिसते आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळी ही म्हणावी अशी दिवाळी दिसत नसून अनेक ठिकाणी करंजीचा गोडवा त्यातील आनंद पाहिजे तसा वाटत नाही असे दिसते.ग्रामीण भागातील पाहुण्यांची असणारी वर्दळ कोरोणाने हिरावली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here