श्रीरामपुर : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “साठी राजेंद्र गायकवाड _ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ आधारकार्ड पासून वंचित असल्याने त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात असून जिल्हाधिकारी ,पुरवठा अधिकारी,तहसीलदार यांनी तात्काळ याबाबतीत लक्ष घालून आधार कार्ड वंचितांना आधारकार्ड मिळून देऊन डोके दुखी बंद करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.याबाबत वंचित असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले की आधारकार्ड नसल्याने रेशन दुकादारांकडून रेशन दिले जात नाही , विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात नाही तसेच ज्यांचे कडे आधारकार्ड आहे त्यांचे नाव चुकल्यामुळे कुठलाच लाभ मिळत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून हि डोकेदुखी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी कायमची थांबउन वंचितांना न्याय द्यावा अशी मागणी केली जातआहे. दसरा सणास गोरगरीब जनतेसाठी आलेले रेशन मिळाले नाही रेशन दुकादारांकडून त्यामुळे मोठीच पिळवणूक केली जात आहे तर सद्या दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात तरी रेशन मिळावे अशी मागणीही केली जात असून संबंधित जिल्हाधिकारी ,पुरवठा अधिकारी,तहसीलदार यांनी रेशन दुकानदारांना आदेश करून आम्हास रेशन देण्याची सुविधा करावी अशी मागणी वंचित असलेल्या नागरिकांनी केली आहे.