वासोळं : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी प्रशांत गिरासे : – गेल्या आठवड्यातील शनिवारी बागलाण तालुक्यातील आराई गावी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चांगल्या चांगल्याची भांबेरी उडाली .अत्यंत गरीब कुटुंबातील देविदास शिवाजी शिंदे स्वताच्या मालवाहतूक रिक्षाने आपल्या पोराबाळांचा कसातरी उदरनिर्वाह करत असे म्हणतात ना गरीब कुटुंब, सुखी कुटुंब त्याप्रमाणे देविदास सुखी होता आणि उराशी दसरा-दिवाळीचे सुखद स्वप्न पहात झोपी जात असे .असेच गेल्या आठवड्यातील झालेल्या पाऊसामुळे त्याच्या स्वप्नाचा क्काचूर झाला.रात्री च्या वेळी असेंच साखर झोपेत असतांना पावसाने दमदार हजेरी लावली असताना पाऊसाने देविदास शिवाजी शिंदे यांची मालवाहतूक रिक्षा पावसाने नाल्यात वाहून नादुरुस्त झाल्याने देविदासच्या गरिबीला मोठेच भगदाड पाडल्याने देविदास पुढे कुटुंब चलितार्थ चा मोठाच प्रश्न उभा राहिल्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे ,आधीच लोकडाऊन मुळे कुटुंब उपाशी राहु नये म्हणून उसन वारी करून कटुबियांना सुखी ठेवले आता तर अवकाळी पावसाने त्याची रिक्षा च बंद पाडल्याने कुटुंबाचा घर खर्चाचा मोठा प्रश्न उभा राहिल्याने महाराष्ट्र शासनाने आपणास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.शासनाने याबाबतीत लक्ष पुरवून गरिबांना पाहिजे ती मदत विना विलंब भरपाई द्यावी अशी मागणी आराई गावातील समस्त ग्रामस्थांनी केली आहे.