मालेगाववासीयांचा वनवास :पावसाळ्यात पिण्याचे पाणी बंद झाले ,गिरणा धरणात शेकडो मासे मृत पावले

0
78

मालेगाव -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – निलेश कासार – नासिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका अजूनही संकटाच्या विळख्यात अडकलेला आहेच ,मालेगाव वासीयांचा हा वनवास अजून किती काळ चालणार ह्या विवंचनेने नागरिक हैराण झाले आहेत , कोरोना अजूनही हार खात नाही त्यातच कुठे आगीची घटना घडते तर दिवसातील जन जिवन अगदी मुठीत जीव घेऊन चालावे लागते आहे इतकी धास्ती माणसांच्या मानगुटी वरती बसली आहेच अशातच ऐन गारव्यात , पावसाळ्यात पाणी असूनही ” पाणी उशाला आणि तहान घशाला ” असा प्रकार काल रात्री पासून घडल्याचा प्रकार उघडकीस आला.येथील गिरणा धरणाच्या पाण्यावर मालेगाव,चाळीसगाव,जळगाव येथील नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न सोडविला जातो अर्थातच ह्या धरणातून वरील गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. सदरच्या धरणात शेकडो मासे मृत पावल्याचे समजल्याने घटनास्थळी कृषिमंत्री दादाजी भुसे,मनपा आयुक्त कासार,उपयुक्त कापडणीस, पारखे आदींनी तात्काळ धरणाकडे धाव घेऊन पहाणी केली शेकडो मासे मृत पावल्याचे आढळल्याने मासे मृत व्हायचे नेमके कारण काय असेल ? ह्या पडताळणीसाठी पाण्याचा नमुना तपासणी साठी नासिक येथे पाठविण्यात आल्याचे आयुक्त कासार यांनी कटा” महाराष्ट्र न्यूज “शी बोलतांना सांगितले त्यामुळेच पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा आदेश कृषिमंत्री आणि आयुक्त यांनी दिल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here