छोट्या करडांना बाळसुग्रास देण्याविषयीची माहिती आपण पाहिली. आता आपण ३ महिन्यांपेक्षा मोठ्या कराडांना द्यायच्या खाद्याची माहिती पाहणार आहोत. कारण, छोटी करडे तरी वेगाने वाढतात. मात्र, पुढे मग अशा कराडांना ९ महिन्यांपर्यंत वाढवताना त्यांची वजनवाढ योग्य पद्धतीने होणे हेही आवश्यक असते. कारण हीच एकमेव गोष्ट नफा वाढवणारी आहे.
तीन महिने वयाच्या कराडांना देण्याचा खुराक तयार करण्याचे घटक आणि त्याची टक्केवारी अशी :
मका भरडा : २०%
डाळ चुनी ३२%
भुईमुग पेंड १५%
गव्हाचा कोंडा ३०%
क्षार मिश्रण २.५%
मीठ ०.५%
अशा पद्धतीने यामध्ये १४ टक्के पचवू शकणारी कच्ची प्रथिने आणि 65 टक्के एकूण पचनीय पदार्थ असलेला खुराक द्यायचे नियोजन करावे.
तसेच या मोठ्या कराडांना वळलेला आणि हिरवा चारा देऊन तयार करावे.
शेळ्या व बोकड यांच्या चंचल स्वभावानुसार त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये होणारे बदल लक्षात घ्यावेत. कारण, अनेकदा काहीही किरकोळ कारणाने किंवा हवामानाच्या बदलानेही त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतात. अशावेळी त्यांनी पोटभर नाही खाल्ले तर जाप्ता बिघडू शकतो. तसेच आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच आरोग्याची काळजीही घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी पशुवैद्यकीय तज्ञ किंवा अनुभवी व्यक्ती यांची गोठ्यामध्ये भेट होईल असे पाहावे.
* संकलन ; प्रशांत गिरासे , प्रतिनिधी, कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “