वासोळ – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे याज कडून –
कंधाणे:- प्रामाणिकपणे केलेल्या कार्यामुळे समाजात अढळ स्थान निर्माण होवुन माणसाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला जातो व दाखवलेल्या प्रामाणिकपणा मुळे समाजाकडुन मिळवलेली शाब्बासकीची थाप ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा महत्वपूर्ण असते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी कंधाणे येथे बागलाण पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार एका सदगृहस्थाचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे होते यावेळी कंधाणे येथील अमृता बिरारी यांना रस्त्यावर सापडलेले पन्नास हजार रूपये त्यांनी प्रामाणिक पणे परत केले होते त्यांच्या हया कार्याची दखल म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की येथील नागरिक वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जात असताना त्यांना वटार गावाजवळ रस्त्यावर पन्नास हजार रुपये पडलेले आढळून आले त्यांनी आपली गाडी थांबवत पैसे ताब्यात घेतले पुढे गावात आल्यावर उपस्थित नागरिकांना कोणाचे पैसे हरवले आहेत का याबाबत विचारणा करून घेवुन जाण्याची विंनती केली व याबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही पैसे घेवुन जाण्याचे आवाहन केले होते.
रक्कम हरवलेल्या माणसाला समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांनी लगेच संबधिताचे घर गाठत ओल्या नेत्रांनी आपबिती कथन केली शेतीच्या भाग भांडवलासाठी संबधित रक्कम एका कडून हातउसनवार घेतली होती पण घराकडे जातांना हे पैसे रस्त्यावर पडले घरी जाऊन जेव्हा पैसे हरविल्याचे कळले तेव्हा आमंच्या पायखालची जमिन सरकली होती पण अमृता बिरारी यांच्या रूपाने देवदुत भेटले होते बिरारी यांच्या हया प्रामाणिक पणाचे सर्वच स्तरावरून कौतूक केले गेले याबाबत त्यांच्या सच्चेपणाची दखल घेत बागलाण पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत बिरारी, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, ग्रामसेवक सतिष मोरे यांनी सत्कार एका सदगृहस्थाचा या कार्यक्रमातंगर्त अमृता बिरारी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन त्यांच्या मायभूमी कंधाणे येथे केले होते.
या कार्यक्रमाच्या वेळी बागलाण चे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे व सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा यावेळी सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला ओम गुरुदेव गँस एजन्सी संचालक राकेश घोडे, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय बिरारी, पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत बिरारी, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, तुळशीदास सावकार, साई सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, बाळासाहेब बिरारी, प्रमोद बिरारी, काकाजी बिरारी, शांताराम बिरारी, चंद्रकांत बिरारी, बाळू बिरारी, सुरेश बिरारी, भास्कर बिरारी, डाॅ संभाजी आहिरे, माणिक बिरारी, व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र भामरे यांनी केले.