इथं दिवसा प्रकाशात मुलीवर बलात्कार केला जातो. आणि रात्री अंधारात तिला जाळले जाते..
🏴निषेध आणी श्रध्दांजली..💐करीताच आपण जगणार आहोत का ?आजून भारतात किती वेळा निषेध व श्रध्दांजली अर्पण करायची..कि,न्याय मिळण्याकरीता जगायचे.. ?
संसदेत निवडून गेलेले दलित
आदिवासी खासदार त्या पक्षांचे बुजगावणे आहेत.ते हथरस प्रकरणी बोलणार नाहीत. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या १९ वर्षीय पीडितेनं दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.१४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते.आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती,तसेच पाठीचा कणाही मोडला होता.रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती.शुद्धीवर आल्यानंतर तिनं न बोलताच आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशाऱ्यांतूनच व्यक्त केले.तिच्या अंगावरच्या जखमाच सगळं काही सांगत होत्या.गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती आणि आज तिची ही लढाई अर्धवट राहिली.रामराज्य असलेल्या उत्तरेत रामायण लिहीणाऱ्या वाल्मिकी ऋषींच्या वंशजाला पाशवी अत्याचाराला बळी पडावे लागले.एरवी राममंदिरासाठी एक होणारे हिंदू कार्यकर्ते त्यांच्या गरीब वाल्मिकी हिंदू बहिणीसाठी एकजूट होणार का ?हेच बघायचे आहे आता..!
*जात बघून मेणबत्या पेटवणाऱ्यांनो..!*
मनिषा वाल्मिकी या तरुणीवर पाशवी अत्याचार होतो परंतु तिला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींच्याच समर्थनात कलेक्टरकडे जातदांडग्यांचा अन् धनदांडग्याचा मोर्चा वळतो, तेव्हा या देशात गरीब बहूजन मुलीच्या अब्रूला काय किंमत आहे की नाही असा प्रश्न पडतो. केवळ गरीब बहूजन मुलगी आहे म्हणून तिच्यावर वाटेल तेव्हा अत्याचार करणार आणि कोठे वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ कापणार हे कोणत्या विकृत अवलादींचे संस्कार म्हणायचे ? मनिषा वाल्मिकी ही आता जिवंत नाही राहिली. उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. तिच्यासाठी अजूनतरी कुठेच मेणबत्या पेटलेल्या दिसल्या नाहीत. निर्भयाच्यावेळी मेणबत्ती पेटवणा-या भारतातातील त्या तथाकथित स्त्रीवादी संघटना आता कुठे गायब झाल्या आहेत.जात बघून जर या देशात मेणबत्या पेटवल्या जाणार असतील तर जातीच्या ठेकेदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, *महालात राहणारी स्त्री असली काय आणि झोपडीत पालात राहणारी स्त्री असली काय या दोन्हीही तेवढ्याच सन्मानीय आहेत.असतात जेवढा आपण या राष्ट्राच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करतो…*
भारतात दर मिनिटाला विविध गुन्हे घडत असतात.परंतु, प्रत्येक गुन्हा हा जात,वर्ग,धर्म,उच्च,निच पाहून त्याची वर्गवारी केली जाते.एका महिलेवर होणारा बलात्कार हा बलात्कारच असतो. पण,त्यातही माणूस वर्गवारी करतो हे तो स्वतः निचतेचे दर्शन घडवितो.जिच्यावर बलात्कार होतो ती महिलाच असते,तिच्या यातना समान असतात,मग,दोन वेगवेगळ्या बलात्काराच्या घटनांना वेगळा न्याय का ? त्यात जात,धर्म शोधणे हे निचतेचेच लक्षण आहे.आणि अशावेळी टिवटिव बाई कंगना आणि बेंबीच्या देठापासून विनाकारण ओरडणारा तो अर्णब कुठे आहे?आता उत्तरप्रदेश सारखा राज्य “सेफ” आहे का ? तिथे पोलिसांनी शुरतेचे काम केले आहे का? उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का..?
रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी प्रेत जाळण्यात आले त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेऊन तिथे जाण्यास सर्वांनाच मनाई करण्यात आली.तिथे काय जाळले आहे हे सांगण्यास पोलिस तयार नव्हते.इथे पलिसांकडून कायद्याचा गैरवापर झाला नाही का?अशाही परिस्थितीत मनिषाने मृत्यू पुर्वी सर्व माहिती पोलिसांना दिली होती.तरीही पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यविधी उरकणे गरजेचे होते का..?
इथे आपल्या महाराष्ट्रात एक नशेबाज नटाने आत्महत्या केली. तेंव्हा भाजपसह कित्येकांनी थयथयाट केला.राज्य सरकारवर त्याच्या आत्महत्तेचे खापर फोडले.राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली.हल्ली प्रत्येक घडामोडींवर टिव टिव करणारी ती नाची कंगना आता ट्विट करायला विसरली का? तिला आता भिती वाटत नाही का? अर्णब गोस्वामी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अपमान करतो.आव्हानाची भाषा करतो.आता त्याची वाचा गेली का? योगी सरकार आणि तेथील पोलिसांना प्रश्न विचारण्याची याची हिंम्मत आहे का? *ज्यांना ज्यांना महाराष्ट्र असुरक्षित वाटत होतो ते आता बोलायचे सोडुन कुठल्या बिळात लपले आहेत.धर्माच्या ठेकेदारांनो आता या ना मैदानात.एका गरीब मुलीला न्याय मिळवून द्या.*
महाराष्ट्रात साधूंची हत्या झाल्यावर सर्व भाजपशासित राज्ये महाराष्ट्रावर तुटून पडली.मात्र, हीच घटना उत्तरप्रदेशात घडल्यावर सर्वांची हाताची घडी आणि तोंडावर बोट.महाराष्ट्रात हत्या आणि मग उत्तरप्रदेशात काय घडले देशात रोजच हत्या,आत्महत्या अत्याचार होत असतात.जात,पात,धर्म,पंथ,गरीब,श्रीमंत पाहून मेणबत्त्या पेटविल्या जातात.दिल्लीत निर्भयावर झालेला बलात्कार आणि उत्तरप्रदेशात मनिषावर झाले लाबलात्कार वेगवेगळा कसा असू शकतो?आता लोकांच्या संवेदना कुठे गेल्या.आता दुकानातल्या मेणबत्त्या संपल्या का ?भारत देशातच बलात्काराला जात,धर्म असतो बलात्कार झालेली ही महिला नसून ती कोणत्या जातीची आहे हे पाहीले जाते..
_*किती ही दुर्दैवी गोष्ट आहे.मनीषा या गरीब मुलीवर झालेल्या बलात्काराचा मी तिव्र शब्दार जाहिर निषेध करतो..!*_
सरकारने महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे केले तरी,स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, ही पुरुषी मानसिकता लोप पावायला मानसामधील नराधम मानायला तयार नाहीत.दिवसेंदिवस महिला अत्याचाराची मालिकेची धग कमी होण्याऐवजी त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे…
खरं तर छञपती शिवराय,महात्मा जोतिराव फुले,महर्षी कर्वे,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर,साविञीबाई फुले इ.महापुरुष व महान स्त्रीयांनी समाजातील असमानता नष्ट व्हावी,यासाठी जीवाचे रान केले.मात्र संविधान लागू झाल्यानंतरही प्रचलित परंपरा कमी होण्याऐवजी त्याची तीव्रता वाढत आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना विविध हक्क बहाल केले आहेत.काळानुसार त्यास कायद्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.असे असताना अंमलबजावणीची गती संथ आहे…
सुशांतसिंह प्रकरण व कंगना प्रकरणाला राष्ट्रीय रंग देणारा इलेक्ट्रॉनिक मिडिया काही अपवाद वगळता प्रसिद्धी का देत नाही,हा खरा प्रश्न असून दिल्ली येथील निर्भया प्रकरण लावून धरणारा हाच मिडिया होता.अर्थात ते योग्यच होते. मग भारतीय मिडिया जात,धर्म पाहून त्याचे महत्त्व निश्चित करतो,असे खेदाने म्हणावे से वाटते.जर देशातील विविध प्रांतात अशा घटना घडत असतील तर,तेथील राज्य सरकारे काय करतात,असा प्रश्न विचारणे आवश्यक आहे.यासाठी कायदा व सुव्यवस्था मागील काही वर्षांत ढासळल्याचे दिसून येते.हा संशोधनाचा विषय आहे…
_*बेटी बचाव;बेटी पढाव..*_
हे घोषवाक्य कागदावर व भिंतीवर न राहता ते वास्तवात उतरण्यासाठी हाथरस सामुहिक बलात्कार घटनेतील आरोपींना फासीची सजा होणे आवश्यक आहे.किंबहुना पुरुषी मानसिकता परिवर्तीत होण्यासाठी शालेय,महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती व अभ्यासक्रमात समतावादी समाजनिर्मितीसाठी आवश्यक ते बदल करणे व शासकीय स्तरावर जागृती कार्यक्रम घेणे काळाची गरज आहे.हे भारतात कुठेतरी थांबायला हव,मृत्युदंड हीच एकमेव शिक्षा असायला हवी.आणि संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी भारत सरकारने प्रत्येक भगिनीना देण्यात यावी..
_आता भावपुर्ण शिवांजली आणी निषेध करणारे होण्यापेक्षा..होय मि केला अन्यायाचा प्रतिकार केला असे म्हणणारे झाले पाहिजे.._
_बहन मनिषा को इन्साफ दिलाने के लिये बुलावा नहीं भेजा, जाता जिसके दिल में आग जल रहीं है,वो खुद चला आता है.._
रामराज्य या पेक्षा शिवस्वराज्य श्रेष्ठ आहे..
लेेेखक :✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे पाटील,9689446003
_रक्तात शिवराय माझ्या, डोक्यात भिमराय._
_सांग तु कोणत्या जातीत नोंद घेणार माझी..