भारत पवार : मुख्य संपादक. आपल्या परिसरातील बातम्या अन्य घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क अवश्य करा. संपर्क : ९१५८४१७१३१
मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव सारख्या तालुक्यात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद पुरुषोत्तम बच्छाव म्हणजेच बंडुकाका बच्छाव हे नाव तालुक्यासह पंचक्रोशीत आदराने नागरिकांच्या तोंडून घेतले जाते.हे शाश्वत आहेच. बंडूकाका गेल्या २५ – ३० वर्षांपासून सामाजिक कार्यात राहून राजकारणात कार्यरत आहेत.त्यांचे आजवरचे समाजकार्य पाहिले तर एखाद्या मंत्र्याला लाजवेल असे कार्य त्यांनी केले आहे.आणि करत आहेत. मालेगाव बाजार समितीत निवडून येऊन समितीचे त्यांनी सभापती पदी विराजमान झाले.त्यावेळी बंडूकाका बच्छाव यांनी शेतकरी हिताचे अनेक प्रश्न सोडविले होते . हे प्रश्न सोडवत असताना शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या.तरीही बंडूकाका बच्छाव हवेत न उडता पाय जमिनीवरच ठेऊन शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने न्याय देत राहिले. त्यामुळे बंडू काका आज मालेगाव बाह्य बरोबरच तालुक्यातील जनतेच्या मना – मनात ठाण मांडले.
सध्या बंडूकाका बच्छाव विधानसभा निवडणुकीत उभे राहून रिक्षा निशाणी घेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे. त्यामुळे मालेगाव बाह्य मधील जनतेत आनंद पसरला आहे. जनतेच्या त्या आनंदाचे खरे रहस्य म्हणजे त्यांनी माणुसकी जपून मानस कमवली. पण पैसा नाही कमवला .त्यांच्यातील सोज्वळ व सुसंस्कारित पणा जनतेस भावला .बंडुकाका बच्छाव आजही प्रेमळ पणाने जनतेत राहूनच जनसेवा करत असल्या कारणाने मालेगाव बाह्य मधील मतदारांनी बंडुकाका यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे जनतेत चर्चा आहे. त्यामुळे बंडुकाका बच्छाव यांच्या स्वभावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचे येथील जनतेने महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
हवेत न उडता पाय जमिनीवर ठेऊनच आणि जनतेत मिसळूनच कोणतेही काम करावे असेही बंडूकाका बच्छाव यांनी जनतेस सांगितले. बंडुकाका यांना मालेगाव बाह्य मधील जनतेने मोठाच पाठींबा दिला असून जनतेच्या काहीही आणि कोणत्याही समस्या असो त्या सोडविण्याचे काम अगदी चुटकीसरशी बंडु काका सोडवित असतात.स्वतःच्या कुटुंबा पेक्षा मालेगाव बाह्य मधील नागरिक माझे कुटुंब आहे. असे मी मानतो. त्यामुळे मालेगाव बाह्य मधील जनता माझा विश्वास घात करणार नाहीत.असा विश्वास काका यांनी व्यक्त केला.तर अनेक ठिकाणी जनतेने स्व इच्छेने बंडु काका यांना वर्गणी जमा करून दिली गेली.त्यामुळे ह्या वेळी आम्हास परिवर्तन करायचे असून बंडु काका यांना आमदार म्हणून आम्हास बघायचे आहे असे मालेगाव बाह्य मधील नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
काही नागरिकांनी बोलतांना सद्याच्या सरकारवर संताप व्यक्त करत सांगितले की , लाडक्या बहिणींना एका भाऊ महिन्याला १५०० रू.देतात परंतु …. १५०० रू.च्या बदल्यात भरमसाठ महागाई करून वसुली केली जात आहे. १५० ते २०० रू.किलो डाळी चे भाव वाढवले , टिव्ही , मोबाईल यांचे रिचार्ज चे डबलचे भाव वाढविले , स्टॅम्प च्या किमतीत दर वाढ केली , गॅस सिलेंडर चे भाव वाढवले मग लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रू.देऊन फायदा काय ? असा संतप्त सवाल मालेगाव बाह्य च्या नागरिकांनी शासनाला केला आहे. निवडणूक झाल्या नंतर पुन्हा अन्य वस्तूंचे तसेच गॅस सिलेंडर चे भाव वाढविले जातील अशी भिती सुद्धा यावेळी अनेकांनी बोलून दाखविली.त्यामुळे एका भाऊच्या ह्या दुटप्पी बाबत सर्वत्र ग्रामीण भागात सुद्धा नाराजी व्यक केली जात आहे. भिक नको कुत्र आवर असे म्हणण्याची वेळ आम्हा नागरिकांवर ह्या शासनाने आणली असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
एकच हवा बंडु काका च आमदार हवा अशी चर्चा मालेगाव बाह्य मधील नागरिकात होत होती.
सोज्वळ , सुसंस्कारित , माणुसकी जपणारा बंडु काका ” आमदार ” पक्का . अशीच चर्चा मात्र आहे.