दिवाळी आली तरी शिक्षकांचे पगार नाहीत लाडक्या बहिणींचे लाड पुरवता पुरवता लाडक्या भाऊंचा विसर एकनाथभाऊंना का पडावा ?

0
19
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                      परखड मुलाखत देऊन आपल्या मतदार संघातील प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात अगदी काही सेकंदात पोहचण्यासाठी संपर्क करा. संपर्क : महाराष्ट्र न्यूज ९१५८४१७१३१

धुळे : क टा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रा. शिक्षकांना वेळेवर पगार द्या. व परमान्ट करा.अशी मागणी  अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया यांनी केंद्र व राज्य शासना कडे केली आहे.
धुळे व महाराष्ट्रात 25/9/2024 पासून युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळेत, माध्यमिक शाळेत तसेच आश्रम शाळेत घाईगडबडीत प्राथमिक शिक्षक सहा महिन्यासाठी भरून घेतलेत, आणि सर्वांना बिना पगारी लटकून धरले, वरील प्रा. शिक्षकांनी दिपावली करायची नाही का? तसेच सहा महिन्या नंतर त्यांनी काय काम करायचे ? असा प्रश्न महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना पडला प्रा.शिक्षक अभिलाल देवरे  सांगतात गेल्या 2009/10 साली महाराष्ट्रात कंत्राटी शिक्षक भरले होते, त्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित करण्याचे आदेश दिलेत. त्या कायद्यानुसार युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांना सुध्दा नियमित करा. असे भारत देशाचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी साहेब, व विरोधीपक्ष नेते राहुल गांधी साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा पवार यांचे कडे देवरे यांनी मागणी केली आहे. जर दीपावलीच्या सनाला युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रा. शिक्षकांना पगार मिळाला नाही, आणि या शिक्षकांना नियमित केले नाहीत तर शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळेल. असा इशारा  प्रा. शिक्षक अभिलाल देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया तसेच महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून राज्य व केंद्र शासनाला दिला.  आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री  फडणवीस , अजित दादा पवार फक्त लाडक्या बहिणींवरच बोलतात. आहो साहेब या राज्याच्या लाडक्या बहिणी फक्त तुमच्याच नाहीत तर आमच्या पण सर्वांच्या लाडक्या बहिणी आहेत. परंतु साहेब लाडक्या भाऊंची पण परिस्थीती कडे बघा. बिना पगारी किती दिवस शाळेत शिकवतील त्यांच्या परिवाराला दिपावली करु देणार कि नाहीत ? असा प्रश्नही देवरे यांनी उपस्थित केला. आपण 1500 रु. बहिणींना देत आहात याचा आम्हाला ही आनंद आहे. बहिण आणि भाऊ एकाच नान्याचे दोन बाजू आहेत,   शिक्षकांना सहा महिन्या नंतर हाताला काम मिळणार नाहीत तर भाची/भाच्याचे शिक्षण कसे करायचे? लग्न कसे करायचे, तसेच परिवारांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या ? असा प्रश्न महाराष्ट्रातील शिक्षकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here