घर का भेदी लंका ढाये , भावाने केला भावाचा विश्वासाने विश्वासघात

0
333
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक.                     आपला मतदार संघ, आपला उमेदवार या सदरात आपली परखड मुलाखत देऊन काही सेकंदात पोहचा आपल्या मतदारसंघातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात. तात्काळ संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा / चांदवड : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर वाचत : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अनेक उमेदवार उतावीळ होऊन मतदार संघातील मतदारांचे उंबरठे झिजवत आहेत.निवडणूक विधानसभेची मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मात्र चांदवड – देवळा विधानसभा मदारसंघा कडे लागले आहे.त्याचे असे झाले ह्या मतदार संघातील अलीकडे असलेले आमदार राहुल आहेर यांनी भाऊ केदा उर्फ नाना आहेर यांना प्रथम पंचवार्षिकलाच शब्द दिला होता की, तिसऱ्या पंचवार्षिकला तू उभा रहा पुढील आमदार तूच (केदा ) असणार असे गाजर दाखून राहुल आहेर यांनी केदा आहेर यांना गेली १० वर्ष राबून घेतले.रात्री अपरात्री मतदारांच्या गाठीभेटी घेत केदानाना यांनी भरभरून मतांची लाखोली राहुल आहेर यांना मिळून दिली. कारण केदा आहेर यांचा जनसंपर्क तेवढा आहे.

यंदाच्या निवडणुकीत केदा आहेर यांना राहुल आहेर यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविण्याची वेळ आली मग का थुंकून … केले.? प्रेस कॉन्फरन्स घेत का तमाशा उभा केला ? १६ ऑक्टोबर रोजी भाजपच्या सेंट्रल कार्यालयातून लिस्ट फायनल होऊन त्यात राहुल आहेर यांचे उमेदवार म्हणून नाव येते तरीही कसलाही कांगावा न करता १७ ऑक्टोबर रोजी देवळा येथे राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत आपण ह्या वेळी निवडणुकीतून माघार घेत केदानाना आहेर यांना पाठींबा देत आहे असे जाहीर करतात म्हणजे किती मोठा विश्वास…! आणि शेवटी कळते की चांदवड – देवळा मतदार संघातून डॉ.राहुल आहेर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर..किती मोठा विश्वास आणि त्या विश्वासाचा विश्वासघात. ! म्हणूनच म्हणावेसे वाटले घर का भेदी लंका ढाये .

खरे तर केदा आहेर यांचा जनसंपर्क मध माशीच्या पोळ्या सारखा खच्चून भरलेला असल्या मुळे डॉ.राहुल आहेर यांना सलग १० वर्ष आमदारकीचे गाजर मिळाले.आणि हेच गाजर त्यांनी जनतेच्या दरबारात सद्या लोंबकळत ठेवले. १० वर्ष मागे गेले तर देवळा आणि चांदवड तालुक्यात भाजप हे नाव कोणाच्याही ओठावर नव्हते. केदा आहेत जेव्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी दोन्ही तालुक्यातील गावागावात जाऊन तरुण , वयोवृध्द , महिला भगिनी आदींच्या भेटी घेत भाजप पक्ष त्यांच्या मनात रुजवला .आणि आज केदा आहेर यांना त्यांच्याच भावाकडून राहुल आहेर यांचे कडून हे ” कडू “फळ मिळावे हि किती शोकांतिका म्हणावी.राहुल आहेर यांच्या साठी केदा आहेर यांनी केलेली जीवापाड मेहनत राहुल आहेर यांनी आमदारकीच्या मोहा पायी क्षणात विसरून विश्वासघात करणे हे जनता विसरणार नाही. ह्या अन्यायाचा ” न्याय” जनता दरबारात केदा आहेर यांना मिळणार याचे ज्वलंत उदाहरण चांदवड व देवळा येथे केदा आहेर यांनी घेतलेल्या सहविचार सभेत अर्थात संवाद मेळाव्यात चांदवड व देवळा येथे लाखोच्या संख्येने जमलेल्या मतदारराजा यांच्यावरून दिसते.

केदा आहेर यांची उमेदवारी डावलण्यात यशस्वी झालेल्या राहुल यांना जनता डावलनार हे मात्र जनतेने नक्की केल्याचे सहविचार अर्थात संवाद मेळाव्यात जनतेने दाखुन दिले.

यावेळी जनता माय बाप यांनी मला आशीर्वाद देऊन आमदार म्हणून निवडून दिल्यास चांदवड आणि देवळा मतदार संघात नक्कीच रामराज्य आणणार अशी भावनिक साद यावेळी केदा आहेर यांनी बोलून दाखविली. मी चांदवड देवळा मतदार संघाचा कायापालट करणार की जे दहा वर्षात व्हायला पाहिजे होते ते झाले नाही ते मी करून दाखविणार .म्हणून आपणच सांगा मी उमेदवारी करावी की नाही असा प्रश्न केदा आहेर यांनी जनतेच्या कोर्टात टाकताच जनतेने जोरदार समर्थन देत ” केदा आहेर तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है” जोरदार नारा लावला. यावेळी केदा आहेर भाऊक होत गेली ३० वर्ष मी अविरत सेवा करतो आहे त्याचेच हे फळ मला माझे माय बाप जनता देणार असेही यावेळी सांगितले.तर अजून वेळ गेलेली नाही भाऊ डॉ.राहुल आहेर यांचा मी पाया पडतो त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी आपल्या आहेर कुटुंबात दुरावा नको अशी सादही केदा आहेर यांनी भावास घातली.

संकलन / शब्दांकन : भारतराज पवार , मुख्य संपादक.                            मो.९१५८४१७१३१

Oplus_0
Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here