चांदवड – देवळा मतदार संघातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : डॉ. आत्माराम कुंभार्डे

0
387
Oplus_131072

(छायाचित्र :  डॉ. आत्माराम कुंभार्डे , कटा.महाराष्ट्र न्यूज , चित्रसेवा )                                                  भारतराज पवार : मुख्य संपादक.                               ” आपला उमेदवार आपला मतदारसंघ ” या सदरात आपली धडक बेधडक मुलाखती साठी संपर्क करा आणि अगदी काही सेकंदात आपल्या मतदार संघातील घराघरात घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहचा . त्वरित संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१
चांदवड / देवळा _ कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाइन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला असून त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते.मतदार संघातील जनतेने मतदान रुपी मला आशीर्वाद दिल्यास तर गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या पाणी प्रश्नाची गंभीर समस्या प्रथम सोडविणार असे आवाहन डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी *महाराष्ट्र न्यूज* शी बोलताना सांगितले.
पुढे त्यांनी बोलतांना सांगितले की, चांदवड _ देवळा मतदार संघाचे राजकारण गेल्या दहा वर्षांपासून पाण्या भोवतीच फिरत असून आज पर्यंत अनेक निवडून आले आणि निवडून गेलेत सुद्धा परंतु येथील मतदार संघातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि विकासाचा पाणी प्रश्न कोणीही सोडविला नाही.फक्त मतदारांना पाणी सोडविणार असे आवाहन करत आमदार म्हणून निवडून आले आणि निवडून गेले सुद्धा.मात्र आज पर्यंत पाणी प्रश्न न सोडविता तो सुद्धा फिरवत ठेऊन जनतेस झुलवत ठेवले. याबाबत आपणास खेद वाटतो. ह्या मतदार संघातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न गंभीर असून त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटली असून विकास थांबला , अनेक शेतकरी कर्ज बाजारी झालेत तर वैतागून अनेकांनी आत्महत्या सुद्धा केल्या. तरीही आमचे नेते चांदवड _ देवळा मतदार संघातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले अशी खंत डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी यावेळी व्यक्त केली.
जनतेने आपणास ह्या वेळेला निवडून दिल्यास आपण पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे मत डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी यावेळी व्यक्त केले.
चांदवड _ देवळा मतदार संघात आपण हरित क्रांती करणार आणि शेतकऱ्यां विकास करून काया पालट करणार असे सांगून चांदवड _ देवळा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून अनुभवत असून समस्या सोडविण्या साठी देवळा व चांदवड येथील तरुणांनी व शेतकऱ्यांनी मला आशीर्वाद दिल्यास मी काया पालट करणार असेही डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here