बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले यशवंत गोसावी यांच्या शिवनिश्चल पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ” गौरव मोरे ” देवळा येथे होणार भरगच्च कार्यक्रम

0
310
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                      महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा :  कटा महाराष्ट्र न्यूज :  ऑनलाईन  वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  :  नाशिक जिल्ह्यातील  देवळा येथे  २२ सप्टेंबर ०२४ रोजी शिवनिश्चल ट्रस्ट तर्फे होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात होणार पुरस्काराचे  वितरण ….                                                               गेल्या १० वर्षांपासून शिवनिश्चल ट्रस्ट चे अध्यक्ष यशवंत गोसावी मोठ्या मेहनतीने आणि उमेदीने जिल्ह्यातील देवळा शहरात मोठाच कार्यक्रम घेत असतात.ह्या ट्रस्टला यशवंत यांच्या रूपाने बहुआयामी व्यक्तिमत्व लाभल्याने शिवनिश्चल ट्रस्ट शिखर गाठण्यास यशवंत ठरत आहे.प्रत्येक वर्षी ह्या ट्रस्ट मध्ये अनाथ मुलांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळेच हे ट्रस्ट महाराष्ट्रात अग्रेसर होऊ पहात आहे. याचे श्रेय अध्यक्ष यशवंत गोसावी यांनाच जाते. ह्या ट्रस्ट चा उद्देश म्हणजेच अनाथांचा नाथ यशवंत गोसावी यांचा हाथ …!  हाच होय.

आई-वडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासह इतरही मदत करण्यासाठी पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने या वर्षाचा मुख्य मदतनिधी वितरण सोहळा २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असल्याची माहिती शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी देवळा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या मदतीचे हे ११ वे वर्ष असून अशा १२७ मुलांचे पालकत्व या ट्रस्टने स्वीकारलेले आहे. या कार्यक्रमप्रसंगी हास्यजत्रा फेम अभिनेते गौरव मोरे यांना शिवनिश्चल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, खासदार निलेश लंके, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, शोभा बच्छाव, प्रसिद्ध उद्योजक दादासाहेब सूर्यवंशी, आमदार डॉ.राहुल आहेर, नाफेडचे संचालक केदा आहेर हे उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील अनाथ व गरजू मुलांना शालेय व इतर साहित्य देत दत्तक घेण्याचा हा मुख्य कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रागंणात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर हे राहणार असून महारोजगार केंद्राचे संचालक भाऊसाहेब पगार, कळवणचे भूषण पगार, रामेश्वर कृषी मार्केटचे चेअरमन राजेंद्र देवरे, बळीराजा फाउंडेशनचे भाऊसाहेब आहिरे, देमको चेअरमन कोमल कोठावदे आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाआधी प्रसिद्ध शाहीर सुरेश जाधव यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील अनाथ मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मायेचे पांघरून घालण्याच्या उद्देशाने संस्थेने हे कार्य हाती घेतले असल्याचे श्री.गोसावी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कार्याध्यक्ष डॉ.डी.के.आहेर, डॉ.सुनील आहेर, भगवान आहेर, अनिल भामरे, पंकज जाधव व इतर सदस्य उपस्थित होते.                                          शब्दांकन / लेखन : भारतराज पवार ( राज्य मुख्यसंपादक) ९१५८४१७१३१

Oplus_131072

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here