भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक. निर्भिड , रोखठोक आणि सणसणीत बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१
मुंबई / महड : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : संजय बोर्डे :
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोड चुक करणाऱ्या स्टंटबाज जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र निषेध- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले .
-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोडचुक करणाऱ्या स्टंटबाज जितेद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करीत आहोत अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली.प्रसिध्दीसाठी स्टंट करताना अनेक लोक भान हरपतात तसेच जितेंद्र आव्हाड यांचे आज भान हरपले होते.प्रसिध्दीसाठीचे स्टंट आणि उथळपना अंगलट येतो. जितेंद्र आव्हाड यांचे तसेच झाले असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्यांना आंबेडकरी जनता माफ करणार नाही.असा भिम टोला ना.रामदास आठवले यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला .
तर महाड येथे भाजपच्या वतीने जोडो मारो अर्थात चप्पल मारो आंदोलन जोरदार करण्यात आले. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड याने फाडल्याने महाड भाजप पक्षाच्या वतीने आव्हाड यांच्या प्रतिमेस चप्पल मारो अर्थात जोडो मारो आंदोलन जोरदार करण्यात आले.आव्हाड याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून आप बिती ओढवून घेतल्याने त्यांच्या या पागल पणाचा निषेध सर्वत्र केला जात असून सर्वत्र संतापही केला जात आहे.
महामानव डॉ.बाबासाहब आंबेडकरांनी 25 दिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे महाड क्रांतिभुमीत दहन केले.25 डीसेंबर हा दिवस दरवर्षी मनुस्मृती दहन आणि स्त्रीमुक्तीदिन म्हणुन आंबेडकरी जनता पाळते.आंबेडकरी जनतेने मनुस्मृती कधीच जाळुन टाकली आहे.आंबेडकरी जनतेने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुध्द आणि त्यांचा धम्म मनापासुन स्विकारला आहे.बुध्द आणि त्यांचा धम्म स्विकारल्यामुळे आंबेडकरी जनतेने मनुस्मृतीला हद्दपार केले आहे.मनुस्मृती दहन दिन आंबेडकरी जनता मनापासुन पाळते.जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहनाकडे प्रसिध्दीचा स्टंट म्हणुन पाहु नये.मनुस्मृतीचा आम्ही सदैव निषेध केला आहे.राज्य सरकार शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेणार नाहीत.असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.तरी जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळण्याचा स्टंट केला तर त्यांनी खुशाल करावा.पण मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करतांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची त्यांनी केलेली चुक अक्षम्य आहे.असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.मनुस्मृती आणि त्यातील विषमतावादी विचार नष्ट करायचे असतील तर महाकारुणी तथागत भगवान बुध्दांच्या धम्माचा स्विकार जितेंद्र आव्हाड यांनी केला पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.