माळवाडी ग्रामपंचायतीने स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे : भारतराज पवार

0
69

भारतराज पवार :  मुख्य संपादक.                            जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : कटा महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र आदर्श आचार संहिता लागू झाली असल्याने जिल्हा परिषद मार्फत व केंद्र आणि राज्य शासनामार्फत केली जाणारी गाव विकासाची नवीन कामे तात्पुरत्या स्वरूपात शासनाने बंद केली आहेत.परंतु आचार संहिता संपल्या नंतर केंद्र व राज्य सरकार मार्फत त्वरित नवीन कामे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे जल्हा परिषद ,सार्वजनिक बांधकाम काम विभाग ( पीडब्ल्यूडी ) , समाजकल्याण विभागा मार्फत , रोजगार हमी योजना ( रोहयो ) मार्फत गाव विकासाची विविध प्रकारची अनेक कामे जिल्ह्यातील  त्या – त्या स्थानिक  ग्रामपंचायतीस दिली जातात ही विकासाची कामे गाव पातळीवर करत असताना देवळा तालुक्यातील माळवाडी  गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक , सरपंच , उपसरपंच यांनी तसेच जिल्ह्यातील सुद्धा ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि उपसरपंच यांनी स्थानिक बेरोजगार युवकांना प्रथम प्राधान्य देऊन गावातीलच बेरोजगार तरुणांना काम द्यावे म्हणजे बेरोजगार तरुणांना काम मिळून बेरोजगारी दूर होण्यास मदत तर होईलच पण बेरोजगार तरुणांचा संसाराचा गाडा सुरळीत चालून त्यांच्या संसारात आनंद निर्माण होईल असे महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक / पत्रकार  भारतराज पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतराज पवार यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासन गाव विकासाची अनेक कामे ग्रामपंचायती मार्फत राबवित असते त्यात विविध शासकीय बांधकामे , रस्ता काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण , विविध ठिकाणी तारेचे कुंपण ( कंपाउंड ) यांसारखी अनेक कामे केली जातात परंतु माळवाडी ( देवळा ) सारख्या ग्रामपंचायतीने आज पर्यंत स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार वा कामेच दिली नसल्याने येथील ग्रामसेवक महाशयांनी बेरोजगारांच्या तोंडास काळेच फासले आहे.त्यामुळे बेरोजगार युवकांची संख्या वाढतच चालली असून बेरोजगार युवकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

यापुढे गाव विकासाची कामे करत असताना बेरोजगार युवकांना विश्वासात घेऊननच कामे केली जावीत कारण अनेक शासकीय कामे करत असताना स्थानिक बेरोजगारांना माहित होत नसते जेव्हा बाहेरगावचे लेबर ( मजूर ) आणून काम चालू केले जाते तेव्हा बेरोजगार तरुणांना माहित होते की ग्रामपंचायती मार्फत काम केले जात आहे.म्हणून यापुढे असे न करता बेरोजगार युवकांना माहिती होण्या साठी तसेच कामात पारदर्शकता येण्या साठी ,भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती मार्फत ग्रामसेवकांनी , ग्रामविकास अधिकाऱ्यांनी , सरपंच , उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केले जाणारे कोणतेही काम असो सुरू करण्याच्या १५ ( पंधरा ) दिवस आधी ग्रामपंचायतीच्या वार्ताफलक / नोटीस बोर्ड वरती दर्शनी भागात स्पष्टपणे वाचता येईल असे सदरची नोटीस लावावी.त्याचप्रमाणे वार्ताफलक वरती सुद्धा मोठ्या अक्षरात लिहिण्यात यावे .सदर नोटीस बोर्ड वरती कामाचा तपशील , काम किती लाखाचे / किती कोटींचे / किती हजार रुपयांचे मंजूर झाले आहे तसेच स्थानिक बेरोजगार कारागीर , मजुरांना हजेरी, रोज किती रुपये दिली जाईल , ठेकेदार ( कॉन्ट्रॅक्टर) , कोण ? त्याचा संपूर्ण पत्ता , मोबाईल नंबर सह स्पष्टपणे सगळ्यांना वाचता येईल असे वार्ताफलक वरती आणि नोटीस मध्ये स्पष्टपणे लिहावे असे ही पत्रकार भारतराज पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

जर स्थानिक बेरोजगारांना किंवा रहिवाश्यांना कामासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले नाही किंवा १५ दिवस आधी नोटीस बोर्ड वरती वरील प्रमाणे नोटीस न लावल्यास त्याचप्रमाणे नोटीस बोर्ड वरती बेरोजगारांसाठी कामे म्हणून लिखाण न केल्यास तर करत असलेल्या किंवा चालू असलेल्या कामाचा किंवा केलेल्या कामाचा किंवा झालेल्या कामाचा कोणताही चेक , बिल येऊ नये किंवा मंजूर करू नये.त्याचप्रमाणे कोणतेही शासकीय काम असो ते गुणवत्ता नियंत्रण दक्षता विभागामार्फत तपासणी करून योग्य प्रमाणपत्र घेण्यात येऊन काम पारदर्शक आणि खात्रीशीर असल्याचे खात्री झाल्याशिवाय कोणताही चेक देऊ नये किंवा बील मंजुर करू नयेत असेही पत्रकार भारतराज पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, ( सीईओ ) जिल्हा परिषद नाशिक , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत वि.) , जिल्हा परिषद, नाशिक, गट विकास अधिकारी ( बिडीओ ) पंचायत समिती,देवळा , सरपंच , उपसरपंच आणि ग्रामसेवक संभाजी देवरे ,  ग्रामपंचायत माळवाडी यांना दिले असून निवेदनाच्या प्रतींची पोहच ( ओसी ) घेतल्याचे पवार यांनी मीडिया मार्फत सांगितले आहे.

बेरोजगार युवकांना काही समस्या असल्यास महाराष्ट्राचे व जिल्ह्यातील तसेच स्थानिक बेरोजगार युवकांनी , रहिवाश्यांनी सुद्धा ९१५८४१७१३१ ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पत्रकार भारतराज पवार यांनी केले  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here