देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : पिढ्यान पिढ्या माळरानावर थंडी वाऱ्याची पर्वा न करता गुजरान करणारे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून गेल्या चार महिन्यांपासून घरादारावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी घराबाहेर पडलेल्या संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण मिळवून दिले त्या बद्धल संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यात आली,आज मराठा समाजाबरोबर इतर समाजालाही आनंद झाला आहे,भाउ बंदकी बरोबर सग्यासोयरांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, वाशी नवी मुंबईच्या शिवाजी चौकात मराठा आरक्षणाची घोषणा होताच महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आला, देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर चौफुलीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहान पुतळ्याची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच साखर वाटून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम,ग्राम पंचायत सदस्य राहुल निकम, सोसायटी सदृश्य कैलास कोकरे, सचिव संजय निकम, सुभाष पगार,योगेश निकम,बबलु निकम, कमलेश निकम, सुनिल कोकरे, दिनकर अहिरे, योगेश हिरे, प्रविण निकम, उमेश निकम,पपु पवार, राजेंद्र निकम, राजेंद्र आहेर, बापू शिंदे, महेंद्र जाधव,भिका निकम, दिपक पवार आदी शिवप्रेमी मित्रमंडळासह.मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : भारतराज पवार : मुख्यसंपादक, मो. ९१५८४१७१३१