भारतीय जनसंसद संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी अशोक सिब्बन यांची नियुक्ती ,सर्वत्र अभिनंदन

0
196

भारत पवार : मुख्य संपादक                                     आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.9158417131.                                          अहमदनगर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क:

राज्यभरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संघर्षात्मक व रचनात्मक कार्यात कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची नुकतीच अहमदनगर येथे सभा संपन्न झाली या सभेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील संघर्षशील कार्यकर्ते उपस्थित होते या सभेत *भारतीय जनसंसद* या नावाने संघटन उभे करून राज्याच्या सामाजिक आर्थिक विषयांमध्ये आग्रमल परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्य कराव्याचे निश्चित करण्यात आले या सभेत राज्यभरातील गेल्या अनेक वर्षापासून संघर्षात्मक व रचनात्मक कार्यचा प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यकर्त्यांनी *एकमताने राज्याचे अध्यक्षपदी श्री अशोक सब्बन यांची निवड करण्यात आली*.

आपल्या निवडीनंतर राज्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताना श्री अशोक सब्बन म्हणाले
जनतेमध्ये आर्थिक साक्षरता व कायद्याची साक्षरता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून *लोकसभागी लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र ही संकल्पना* जनतेत रुजवण्यासाठी प्रयत्न करणार राज्यातील लढवय्ये असलेल्या कार्यकर्त्यांमुळे शासन प्रशासनाशी लढा देऊन मोठा संघर्ष करून अनेक कायदे जनतेसाठी मिळवून दिले. *माहितीचा अधिकार, 73 घटना दुरुस्तीची अंमलबजावणी, ग्रामसभेस व्यापक अधिकार, सेवा हक्क कायदा, दप्तर दिरंगाई, बदलांच्या संदर्भात कायदा, दारूबंदीचे व सहकारी संस्थांचे धोरण* अशा संघर्षातून मिळवलेल्या अनेक कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही ती करण्यासाठी सक्षम अशी संघटना बांधण्याचा संकल्प करून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात नमूद केलेल्या उद्देशाप्रमाणे *समताधिष्ठ समाज निर्मितीच्या कार्यात निस्पृहपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची भक्कम अशी *संघटना भारतीय जनसंसदेच्या* माध्यमातून उभी करू अशी ग्वाही दिली. अशोक सब्बन पुढे म्हणाले की *आपण कार्यकर्त्यांनी आपल्या आलेली मरगळ, नैराश्य दूर करून कोणतीच खंत न बाळगतात वरील उद्देशाप्रती क्रांतिकारी कार्यात जोमान सतत कार्यरत राहणे आवश्यक आहे* आपण सर्व सतत कार्यरत राहून आपणच व्यवस्था परिवर्तनाची क्रांती यशस्वी करू शकतो आपण सर्वांनी सक्रिय होऊन *राज्यात भारतीय जनसंसदच्या* माध्यमातून सामाजिक आर्थिक विषयावर परिवर्तनाची क्रांती करणारी संघटना व शासन प्रशासनावर दबाव, अंकुश ठेवून प्रत्यक्ष शासन, प्रशासना कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी लोकसहभाग करणारी संघटना म्हणून सक्षम उभी करावी असे आवाहन केले.या बैठकीत जिल्हा अध्यक्षा सह राज्य कार्यकारणी निवडण्यात आली.क प्राध्यापक डॉ. बालाजी कोम्पलवार नांदेड, ॲड.कारभारी गवळी अहमदनगर,
अल्लाउद्दीन शेख पनवेल, प्रभाकर कोंढाळळकर पुणे, हेरंब कुलकर्णी अहमदनगर, राधेश्याम जगताप पुणे, शंकरराव बगाडे रायगड, शशिकांत शर्मा धुळे, अविनाश आंबेकर चंद्रपूर, डॉ. शिवनाथ कुंभारे गडचिरोली,प्रकाश पोरवाल लोनावळा,भावेश पटेल मुंबई, सय्यद मीर कारवाडीकर हिंगोली, यांचे राज्य कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली

या सभेमध्ये जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली
सुधीर भद्रे अहमदनगर,
विजय खारोडे गडचिरोली, बाळासाहेब दौंडे नाशिक,
एकनाथ भाई पाटील नंदुरबार, सुरेश पाटील जळगाव,
हनीफ शेख लातूर, ॲड. धोंडीबा पवार नांदेड,
शैलेश पिसाळकर यवतमाळ,
विठ्ठलराव बदखल चंद्रपूर,
माधवराव तरोणे गोंदिया,
संजय माने सातारा,
ज्ञानेश्वर धायगुडे हिंगोली,
भारत पाटील पालघर,
प्रभाकर जाधव ठाणे,
युयुत्सु आर्ते रत्नागिरी,
सुधीर सुर्वे बुलढाणा,
रामराव बोर्डे छत्रपती संभाजीनगर, नानासाहेब कानगुडे सोलापूर, शिवशंकर गायकवाड जालना, भास्कर कोसुरकर वर्धा,विंरेद्र राजमाने सांगली,डाॅ.लक्ष्मण जाधव परभणी,
शंकरदादा बडवाईक भंडारा,बाळासाहेब उर्फ मारूती चौधरी पुणे जिल्हा,विलास सुर्यवंशी पुणे शहर
महिला जिल्हाध्यक्षपदी श्रीमती ज्योती मारुती लांडगे चंद्रपूर, श्रीमती ज्योतीताई विजय कोमलवार, गडचिरोली यांची निवड करण्यात आली
या सभेमध्ये अहमदनगर जिल्ह्या अध्यक्ष सुधिर भद्रे यांनी स्वगत केले. संघटनात्मक व रचनात्मक काम करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित होते या सभेत अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असलेले वयोवृद्ध 93 वर्षाचे भा.को साळवे गुरुजी यांनी भारतीय जनसंसदेसाठी आपल्या निवृत्ती वेतना मधून एक लाख रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले
त्यांचा ही या निमित्ताने पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक ढगे नेवासा यानी चर्चेत भाग घेवून ठराव मांडलेत. प्राचार्य सुभाष कडलग ,कैलास पठारे
दिल्लीतील आंदोलनामध्ये प्रसिद्ध केलेल्या गांधी टोप्याचे जनक सचिन साळुंखे संजय देशमुख हे सुद्धा उपस्थित होते.अर्शद शेख,पत्रकार कारभारी गरड,रामराव पा.भदगले, भाऊसाहेब सुद्रिक, जाफरभाई,बीरबहादूर प्रजापती, पोपटराव साठे, सुनील टाक,म्हातारदेव ढाळे,सुखदेव मर्दाने,सिध्देश्र्वर चिटमील,शिवाजीराव नाईकवाडी,बबलु खोसला, राम धोत्रे, जनार्दन शेजूळ,फकीर महंमद, कुमार डावखर,शेख अजिमोउद्दीन,अप्पासाहेब माळवदे, रंजन लोखंडे, श्रीमती निर्मला ओहोळ, अशोक डाके, मंहम्मद इक्बाल,प्रा.डाॅ. राम बोडखे,लहानु सदगीर,पंचायतराजचे गाढे अभ्यासक नामदेव घुले,पत्रकार आशिष बोरा,प्रा.नानासाहेब खराडे,सोमनाथ दंरदले,ज्ञानेश्र्वर चौधरी, रईस शेख,व्यंकटराव धट,उमेश माकोणे,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी कोम्पलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अल्लाउद्दीन शेख यांनी केले.  _ *  हेंरभ कुलकर्णी .

नियुक्ती : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे. इच्छुक तरुण , तरुणींनी संपर्क करावा. मो. 9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here